शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

कीटकजन्य आजारात २० गावे जोखमीची

By admin | Updated: March 13, 2016 14:24 IST

हिंगोली : जिल्ह्यातील २० गावे किटकजन्य आजारांबाबत जोखमीची आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील २० गावे किटकजन्य आजारांबाबत जोखमीची आहेत. या गावांत वर्षभर विविध उपक्रम किंवा मनरेगात डासमुक्ती अभियान राबविण्यास गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून सांगण्यात आले आहे. यात हिंगोलीमध्ये फाळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कनेरगाव नाका, आडगाव मुटकुळे तर भांडेगाव केंद्रांंतर्गत बासंबा, इंचा या गावांचा समावेश आहे. वसमतमध्ये गिरगाव केंद्रांतर्गत माळवटा, सोमठाणा, हट्टा केंद्रांतर्गत करंजाळा, चिखली तर कळमनुरीमध्ये डोंगरकडा केंद्रांतर्गत वारंगा, चिखली (जुनी), वाकोडी केंद्रांतर्गत वाई तर मसोड केंद्रांतर्गत सेलसुरा, रामेश्वर केंद्रांतर्गत दांडेगाव ही गावे जोखमीची आहेत. औंढ्यात पिंपळदरी केंद्रांतर्गत पिंपळदरी, काकडदाभा, शिरडशहापूर केंद्रांतर्गत माथा, जवळा बाजार केंद्रांतर्गत वडद तर सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह या केंद्रांतर्गत माझोड, कवठा आरोग्य केंद्रांतर्गत वटकळी या गावांची निवड केली आहे. जिल्हाभरात एकूण ७११ गावे असून २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २०१५ मध्ये हिवतापासाठी ७० हजार ७७६ प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष ६३ हजार ४८६ असे एकूण १ लाख ३४ हजार २६२ रक्तनमुने तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यापैकी ३ नमुने हिवताप दूषित आढळले. मात्र वर्षभरात हिवताप, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजाराच्या उद्रेकाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे हिवताप कार्यालयाचे म्हणणे आहे. जोखमीच्या गावांत तापाचे रुग्ण आढळल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांनी भेटी देवून जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, नियमित कीटकशास्त्रीय कंटेनर सर्वेक्षण करायचे आहे. इडीस डासआळी आढळल्यास १०० टक्के घरांना भेटी देवून टेमिफॉस फवारणी करीत आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबण्यास मदत झाली. डासोत्पत्ती वाढल्यास पाण्यात जळालेले आॅईल, रॉकेल, वंगण अथवा गप्पी मासे सोडावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.निवडलेल्या गावात मनरेगात शोष खड्डे घेवून डासांची उत्पत्ती थांबवून त्या गावात पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. रस्त्यावर खड्ड्यांत साचणारे पाणीही साठणार नाही. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ही कामे करण्यास सांगितले. तर एक दिवस तरी कोरडा पाळणे गरजेचे आहे.