शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतुकीची २० वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 23:49 IST

परभणी : विधानमंडळ अंदाज समितीने दोन दिवसांपूर्वी पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई होत नसल्याने झाडाझडती घेतल्यानंत

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानमंडळ अंदाज समितीने दोन दिवसांपूर्वी पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई होत नसल्याने झाडाझडती घेतल्यानंतर शनिवारी पोलिसांच्या पथकाने पालम तालुक्यातील पारवा शिवारात कारवाई करीत २० वाहने जप्त केली आहेत.५ व ६ जुलै रोजी विधानमंडळ अंदाज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या समितीने गंगाखेड, पाथरी तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीचे वास्तव चित्र पाहिले होते. त्यानंतर गंगाखेड तालुक्यातील दोन तलाठी व एका मंडळ अधिकाऱ्याला समितीच्या संतापानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. पाथरीत मात्र गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या काही टिप्पर चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ४ पोकलेन मशीन व तीन टिप्पर पळून गेले होते. या प्रकरणात समितीने गुरुवारी पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन व पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या आदेशानुसार विश्व पानसरे, सपोनि. ननवरे, चोरमले, पोह.सिरसकर, बाविस्कर, टेंगसे, खंदारे, पोना. टिप्पलवाड, पोशि. स्वामी, लांडगे, टेकाळे, राठोड, शकील, मुस्तफा, तिडके, मोडके, जोंधळे, एकीलवाले यांच्या पथकाने पालम तालुक्यातील पारवा शिवारात कारवाई केली. त्यामध्ये महसूल विभागाने सील केलेल्या वाळू साठ्यातून अवैधरीत्या रेती चोरुन नेत असताना ३ हायवा टिप्पर पकडले. तसेच अवैध वाळू चोरुन वाहनात भरण्याच्या तयारीत असलेले १७ ट्रक पकडले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपविभागीय अधिकारी भोसले, पालमचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक शर्मा यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर ताब्यात घेतलेली वाहने व जप्त केलेला १५ ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यात आला. याबाबत मंडळ अधिकारी विजय बोधले यांच्या फिर्यादीवरुन पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.