जालना : नियमांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील २० दुकानांचे परवाने रद्द तर १३ दुकानांचे परवाने काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. गत काही दिवसांत अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली.अन्न व औषध प्रशासनाने मेडिकल दुकानांसाठी सौंदर्यप्रसाधन कायद्यासह अनेक नवीन नियम लागू केले आहेत. असे असले तरी अनेक दुकानदार या नियमांची पायमल्ली करीत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले होते. काहींच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार विभागाने गत काही दिवसांत कारवाई करीत जिल्ह्यातील मेडिकल दुकानांची सखोल चौकशी करुन २० परवाने रद्द तर १३ परवाने काही काळासाठी रद्द केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने ४६ औषधी विक्री करण्यासाठी मार्च २०१४ पासून एच १ शेड्यूल (हैदराबाद वन) हे नवीन धोरण जाहीर केले आहे. यानुसारच मेडिकल दुकानदारांनी औषधींची विक्री करणे अनिवार्य आहे. असे असले तरी अनेकांनी या नियमांचा भंग केल्याचे तपासणीत आढळून आले. १३ औषधी दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यात जालना तालुक्यातील ९ तर भोकरदन तालुक्यातील ४ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले.याविषयी औषधी निरीक्षक चंद्रकांत मोरे म्हणाले, औषधी दुकानांची नियमित तपासणी करण्यात येते. आतापर्यंत २० दुकानांचे परवाने रद्द तसेच १३ चे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. प्रत्येक दुकानदाराने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधींची विक्री करु नये. तसे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. प्रशासनने दिलेल्या नियमांची तंतोतत पालन करणे गरजेचे आहे. यापुढेही गैरप्रकार करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही नवीन नियमांचे अवलोकन करणे गरजेचे असल्याचे मोरे यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक दुकानदाराने नियमित परवान्याचे नूतनीकरण करण्यासोबतच नियमांचे पालन करण्याचे आवाहन मोरे यांनी केले. (प्रतिनिधी)१३ दुकानांचे तात्पुरते निलंबनजालना- ४, परतूर ३, अंबड- १, बदनापूर-३, भोकरदन- ६, घनसावंगी २, मंठा- १ मिळून २० दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, यातील काहींनी परवाना रद्द प्रकरणात स्थगिती मिळविली तर काहींचे परवाने रद्दच आहेत.जिल्ह्यात ८०० औषधी दुकाने आहेत. त्यापैकी ४०० दुकाने जालना शहरात आहेत. अंदाजे दिवसाकाठी दहा लाख रुपयांची औषधी दिवसाकाठी विक्री होत असल्याचा अंदाज आहे. पेन किलर तसेच काही अँटीबायोटिक औषधी विक्री करण्यावर बंदी आहे.
जिल्ह्यातील २० औषधी दुकानांचे परवाने रद्द
By admin | Updated: July 22, 2014 00:17 IST