शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याचे ३६ शाखातील २० कोटी येणे बाकी

By admin | Updated: July 19, 2015 00:26 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविम्यापोटी ३३६ कोटी ६३ लाख रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे. त्यातील ३६ शाखेतील २० कोटी रुपये येणे बाकी असल्याची माहिती

शिरीष शिंदे , बीडजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविम्यापोटी ३३६ कोटी ६३ लाख रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे. त्यातील ३६ शाखेतील २० कोटी रुपये येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे यांनी दिली.खरीप हंगामासाठी ३३६ कोटी ६३ लाख ९१ हजार रुपये पीकविमा मंजूर झाला होता. स्टेट बँक आॅफ इंडियांच्या १३ शाखांमध्ये १९ हजार ६६६ शेतकऱ्यांनी भरलेल्या पीकविमा वाटपाची यादी तयार करण्यात आली असून, २९ कोटी ३२ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. ग्रामीण बँकेसाठी ३१ कोटी १० लाख रुपये पीकविमा रक्कम मिळाली असून तेथील शेतकरी संख्या ६५ हजार ४९० आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४ लाख ६९ हजार ३५२ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला असून २५१ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडिया सिरसमार्ग शाखेसाठी ९९ लाख ६१ हजार रुपये पीकविमा रक्कम मिळाली असून, शेतकरी सभासद १३ हजार आहेत. या बँकेतील शेतकऱ्यांची यादी अद्याप आलेली नसल्याचे बँक अधिकारी बोकाडे यांनी सांगितले.स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या १७ शाखांसाठी १३ कोटी १२ लाख ६३ हजार रुपये पीकविम्यापोटी मिळाले आहेत. त्यापैकी घाटनांदूर, नागापूर शाखेला ४ कोटी ७० लाख रुपये प्राप्त झाले आहेत मात्र, अद्याप यादी आली नसल्याचे बँक अधिकारी बोकाडे यांनी सांगितले.पीकविम्याची रक्कम इन्शुरन्स कंपनीकडून दिली जाते. मात्र, अद्याप जिल्ह्यातील ३६ बँकेच्या शाखेतील पीकविम्याची २० कोटी रुपयांची रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्याचे बँक अधिकारी बोकाडे म्हणाले.दरम्यान, पीकविम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकरी वारंवार चकरा मारीत आहेत. परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत ४० कोटी पीकविमा रक्कम वाटप केली आहे. ग्रामीण बँकेने ३० कोटी रुपये वाटले आहेत. ग्रामीण बँकेच्या काही शाखांमध्ये शेतकऱ्यांचे खाते क्रमांक जुळत नसल्याच्या तक्रारी आहेत.