आशपाक पठाण , लातूरपादचाऱ्यांचा फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. लातूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले असून, मुख्य ठिकाणी दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत चालले आहे. शिवाजी चौक ते ५ नंबर चौक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ३३२ अतिक्रमणे आहेत. तर शाहू चौक ते विवेकानंद चौकात २७० व्यावसायिकांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. तर गांधी चौकात पार्किंगच्या जागेवर भेळ, आईस्क्रीचे गाडे लावण्यात आली आहेत. ‘लोकमत चमू’ने शनिवारी शहरातील प्रमुख चौकांत केलेल्या सर्वेक्षणात २ हजार १३० अतिक्रमणांची संख्या आढळून आली आहे.शिवाजी चौकापासून दयानंद गेटपर्यंत ४३ हातगाडे रस्त्यावरच लावण्यात आली आहेत. दयानंद गेटपासून फुटपाथवर पहिले चार अतिक्रमण हे फुल विक्रेत्यांचे आहे. अंडा आम्लेटचे १४ गाडे आहेत. शिवाय, भेळ, पावभाजी, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, पानटपरी आदी जणांचे ११३ अतिक्रमणे आहेत. जवळपास दीड ते दोन हजार फुट लांबीचा हा फुटपाथ खाजगी व्यावसायिकांच्या विळख्यात सापडला आहे. उषाकिरण पेट्रोलपंपासमोर असलेला वडापाव बाजारही फुटपाथवरच सुरू आहे. वडापावच्या पाच दुकानदारांनी फुटपाथ व्यापून घेतला आहे. पुढे बहुतांश दुकानदारांचे साहित्य फुटपाथवरच ठेवण्यात आले आहे. रेल्वे रुळावरील समांतर रस्त्यावर तर भाजीपाला विक्रेत्यांचा ठिय्या असतो.महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईकडे कानाडोळा केल्याने ५० टक्के जागांवर पक्के अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे़ हातगाड्यांवरील फळविक्रेते रस्त्यावर थांबल्याने ओरड करणाऱ्या पालिका प्रशासन, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दुकानमालकांनी फुटपाथ व रस्ते व्यापले, याकडे का लक्ष दिले जात नाही, अशी ओरड होत आहे़ ४नांदेड रोडवरील शाहू चौक ते विवेकानंद चौक मार्गावरील दुकानदारांनी फुटपाथ व्यापून घेतला आहे. शाहू चौकात एका हॉटेल चालकाने टपरीच फुटपाथवर मांडली आहे. पुढे पलंग, कपाट, गादी आदी साहित्यांची विक्री करणाऱ्या चार व गॅरेज, अन्य साहित्यांची दुकाने असलेल्या १७ व्यावसायिकांनी फुटपाथवर दुकान मांडले आहे. विवेकानंद चौकात १३७ हातगाडे व दुकानमालकांचे अतिक्रमण आहे. चौकाच्या चोहोबाजूंनी हातगाडे व दुकान मालकांनी अतिक्रमण केल्याने चौकाचा जीव गुदमरून जात आहे. ४शिवाजी चौकापासून औसा रोडने गेल्यावर रस्त्याच्या एका बाजूला मोसंबी ज्यूस, पानपुरी, अंडा आम्लेट, पानटपरी आदी ४७ व्यावसायिकांनी रस्त्याच्या बाजूला खुर्च्या मांडल्या आहेत. पुढे बहुतांश व्यापाऱ्यांनी फुटपाथ व्यापला आहे. बँका व अन्य खाजगी कार्यालयांसमोरील जागा पार्किंगसाठी वापरण्यात येत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. राजीव गांधी चौकातून शिवाजी चौकाकडे येत असताना नंदी स्टॉप भागात अतिक्रमण असून, उड्डाण पुलापर्यंत दुकाने थाटण्यात आली आहेत.शिवाजी चौकात २६ अतिक्रमणे...४शिवाजी चौकात असलेल्या एका नामांकित हॉटेलसमोर नेहमीच पार्किंगने निम्मा रस्ता व्यापलेला असतो. शिवाय, फुटपाथवर टपरी व हॉटेलचेही साहित्य ठेवण्यात येते. त्याचबरोबर पोलिस ठाण्याच्या समोरच शिवनेरी गेट ते शिवाजी चौक जवळपास एक हजार फुटांचा हा फुटपाथ दुकान मालकांनी व्यापला आहे. या भागात २६ अतिक्रमणे आढळून आले आहेत.
फुटपाथवर विसावली २ हजार अतिक्रमणे !
By admin | Updated: December 21, 2014 00:10 IST