भोकर : भोकरसाठी आजचा मंगळवार अपघाताचा दिवस ठरला़ एकाच दिवशी तालुक्यातील चार मुख्य रस्त्यांवर वेगवेगळे अपघात होवून दोघे जण जागीच ठार झाले, तर १५ जण जखमी झाले असून यापैकी ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे़ मंगळवार हा अपघाताचा दिवस ठरला़ सकाळी ६ वाजता भोकर-नांदेड रस्त्यावरील वाकद शिवारात एका अज्ञात व्यक्तीला ट्रक क्ऱ एम़एच़४४- ८२७१ ने जोराची धडक दिली़ यात अज्ञात व्यक्ती जागीच ठार झाला़ दुपारी ३ च्या सुमारास दोन अपघात झाले़ भोकर-किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाजवळ एम़ एच- २६-ए़ डी़ ६३२० हा मालवाहू टेम्पोने एका आॅटोला धडक दिल्याने आॅटोतील महादू कºहाळे (वय ६५), धम्मशीला शेळके (२३), वर्षा शेळके (१७), सुनील जंगमवाड (२०), संतोष घारगे (२०) हे गंभीर जखमी झाले असून यांना भोकर येथे उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे़ तर श्याम लाडेवाड (१९), साहेबराव पट्टेपवाड (२८) सर्व रा़ थेरबन हे किरकोळ जखमी झाले आहेत़ याच दरम्यान, मुदखेड रस्त्यावरील रिठ्ठा शिवारात विश्वनाथ नारायण राजमोड (३८) हा दुचाकी क्ऱ एम़एच़२६- के़९३५ ने जात असताना जनावरांना धडक देवून झालेल्या अपघातात मृत्यू झाला़ तर अंदाजे ४ वाजेच्या सुमारास भोकर-म्हैसा रस्तयावरील मातूळ शिवारात एम़एच़२६-जी़४४३८ हा अवैध प्रवासी वाहतूक करणारा आॅटो उलटल्याने यातील प्रवासी तिमन्ना फकीरा निमकर (५५), बालाजी गंगाराम गिरेवाड (३८), हनुमंत शिवाजी पवार (६०) हे गंभीर जखमी झाले, तर बालाजी मानेबोईनवाड, पिराजी लिमकर, शीतबाई लिमकर, पिराबाई किरेवाड हे किरकोळ जखमी झाले़ सदरील जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ़ सचिन हुलसुरे, बाळू पिंपळे, परिचारिका सुनीता वाठोरे, नारायण मेंढके, शेळके यांनी उपचार केले़ अपघात विभाग नावालाच भोकर येथे अपघात विभागाला सुरुवात झाली असली तरी हा अपघात केवळ नावालाच आहे़ कारण अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोणत्याही रुग्णांना येथे उपचार करण्यासाठी सुविधा नाहीत ना तज्ञ डॉक्टर नाहीत, यामुळे हा अपघात विभाग कशासाठी? असा प्रश्न समोर येत आहे़ (वार्ताहर)
भोकर तालुक्यात २ ठार, १५ जखमी
By admin | Updated: May 7, 2014 00:51 IST