शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या संचालकावर औरंगाबादेत २ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:17 IST

मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न करणाºया शुभ कल्याण मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ आणि मॅनेजरविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात सोमवारी आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सोसायटीने तक्रारदारांची २ कोटी १९ लाख ५२ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न करणाºया शुभ कल्याण मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ आणि मॅनेजरविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात सोमवारी आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सोसायटीने तक्रारदारांची २ कोटी १९ लाख ५२ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.दिलीप आपेट, भास्कर शिंदे, अजय आपेट, विजय आपेट, अभिजित आपेट, बापूराव सोनकांबळे, शिवकुमार शेटे, राम महादेव रोडे आणि पाच महिला आरोपींचा यात समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार रितेश सतीश कुपलानी (३३, रा. सिंधी कॉलनी) यांचे त्रिमूर्ती चौकात कापड दुकान आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी आरोपींनी तक्रारदार यांच्या दुकानात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोसायटी ही विविध राज्यांत कार्यरत असून, कोट्यवधींची उलाढाल करीत असते. मुदत ठेवीवर सोसायटी अन्य वित्तीय संस्थांपेक्षा अधिक परतावा देते हे पटवून दिले. सोसायटीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ हे स्वत: गुंतवणूक सुरक्षित असल्याची ग्वाही देत असल्याने तक्रारदारांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यांनी सोसायटीत रोख रक्कम मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवली.या ठेवीचे प्रमाणपत्रही सोसायटीने त्यांना दिले. मुदत संपल्यानंतर तक्रारदार सोसायटीच्या कार्यालयात गेले असता कार्यालयास त्यांना कुलूप दिसले. त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आरोपींनी कट रचून आपली फसवणूक केल्याचे समजल्याने कुपलानी यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन तक्रार दिली.पोलीस आयुक्तांनी तक्रार अर्जावर कारवाई करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तक्रारीची चौकशी करून याप्रकरणी सोमवारी रात्री जवाहरनगर ठाण्यात सोसायटीच्या संचालक मंडळासह अधिकाºयांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक नवले हे तपास करीत आहेत.यापूर्वी दोन गुन्हे दाखलफसवणूकप्रकरणी सोसायटीविरुद्ध क्रांतीचौक, सिटीचौक ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे नोंद आहेत. शिवाय राज्यातील विविध ठिकाणीही गुन्हे दाखल होत आहेत. जवाहरनगर ठाण्यात सोमवारी दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. या प्रकरणातील आरोपी शेटे हा अटकेत असून, अन्य आरोपींनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.