शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२ कोटी ६६ लाखांचा आराखडा

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

गोकुळ भवरे, किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवटने केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्युक्लिअस बजेट अंतर्गत २०१४-१५ या वर्षाचा २ कोटी ६६ लाख ७० हजार रुपयाचा

गोकुळ भवरे, किनवटएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवटने केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्युक्लिअस बजेट अंतर्गत २०१४-१५ या वर्षाचा २ कोटी ६६ लाख ७० हजार रुपयाचा आराखडा मंजुरीसाठी पाठविला आहे. या आराखड्याचे वैशिष्ठ्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याण्याच्या नव्या योजना घेतल्या आहेत.महाराष्ट्र राज्यात निरनिराळ्या क्षेत्रात राहणाऱ्या विविध आदिवासी जमातीच्या विकासाच्या प्रगतीमध्ये ठिक-ठिकाणी तफावत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विकास कार्यक्रमाच्या गरजाही भिन्न आहेत. त्यामुळे प्रकल्प कार्यालयामार्फत राबवावयाची कर्जविरहीत केंद्रवर्ती अर्थ संकल्प न्यूक्लिअस बजेट योजना आहे. दरवर्षी या योजने अंतर्गत उत्पन्न निर्मित व वाढीच्या, मानव साधनसंपती विकासाच्या योजना लोकवाटा सहभागातून तर प्रशिक्षणाच्या विना लोकवाटा सहभागातून राबवल्या जाते. यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतात बोअर मारुन घेणे, शेताला तार कंपाऊंड करणे, पेट्रोल, स्प्रेपंप ह्या नवीन योजना घेतल्या आहेत.मानव साधन संपत्ती विकासाच्या योजनेसाठी १ लाख ५ हजार रुपये लोकवाटा सहभाग असणार असून ५० लाख २० हजार रुपये शासनाचा सहभाग असणार आहे. एकूण ५१ लाख २५ हजार रुपये प्रस्तावित आहेत. प्रशिक्षणाच्या योजनेसाठी १४ लाख ६० हजार रुपये प्रस्तावित आहेत. ८५ टक्के अनुदानावर ५१० आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना २०१४-१५ वर्षात प्रस्तावित आहेत. मानवी साधन संपत्ती व विकासाच्या योजनेत गोडवन उपजसाठी पाच गावे मासेमारी समितीसाठी तीन गांवे प्रस्तावित आहेत. प्रकल्पातील १७ आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचन लेखन गणित इत्यादी प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहेत. प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष प्रा. विजय खुपसे,प्रकल्प अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आराखडा तयार केला आहे़