शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

१९ हल्लेखोरांची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत तोडफोडप्रकरणी आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तोडफोडीत जवळपास ...

ठळक मुद्देवाळूज एमआयडीसी तोडफोड : पोलिसांनी नोंदविले सात गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत तोडफोडप्रकरणी आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तोडफोडीत जवळपास ६० कोटींचे नुकसान झाले. याप्रकरणी आतापर्यंत ४९ कारखान्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात आल्याआहेत.मराठा आरक्षणासंदर्भात ९ आॅगस्टला पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. औद्योगिकनगरीतील अनेक कंपन्यांत यंत्रसामुग्री व साहित्याची तोडफोड करण्यात आली. उद्योजकांनी शुक्रवारपासून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली होती. तोडफोड करणाऱ्या १७ हल्लेखोरांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी अटक केलीहोती.आतापर्यंत इंडुरन्स, स्टरलाईट, सिमेन्स, व्हेरॉक, कॅनपॅक, वोक्हार्ट, तुळजा, गुडईअर, तुषार इंडस्ट्रीज, एफडीसी, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, मार्गनाईट, युरोलाईफ, कोलगेट, जे. के. केमिकल्स, मायलॉन, नहार इंजिनिअरिंग, कॉम्प्टन अ‍ॅण्ड ग्रिव्हज, एनआरबी बेअरिंग आदी कंपन्यांत ५९ कोटी ९० लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.आतापर्यंत ४९ कंपन्यांनी दिली तक्रारएमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात शनिवारी स्पेशालिटी पॉलिफिल्मस्, काल्सबर्ग, मेकॅनिक्स, आकांक्षा पॅक्स, मेटलमॅन आॅटपो, बेसेल पॉलिफिल्मस्, अत्रा फार्मास्युटिकल, नरेश इंजिनिअरिंग, भारत इन्शुलेशन, श्री गणेश प्रेस अ‍ॅण्ड कोट, कमलेश ट्रान्सपोर्ट, विनोद इंटरप्रायजेस, श्रेया लाईफ, टायोलुसीड, मान डिझेल अँड टर्बो इंडिया, व्हॅक्युल कंपोनंटस् अ‍ॅण्ड प्रोजेक्ट, न्यू बॉम्बे इंजिनिअरिंग, शिवम रबर इंडस्ट्रीज, कॉस्मो फिल्मस्, यशश्री प्रेस कॉम्पस प्रा. लि., युनायटेड जनसेट ट्रॉली, ट्रम्फ प्रा.लि., शुभनिल इंडस्ट्रीज, जे. एल. मॉरिसन इंडिया, मराठवाडा आॅटो कॉम्पो प्रा. लि. व अमरी इंडिया आदी ४९ कंपन्यांनी तक्रार दिली आहे.दुसºया दिवशीही धरपकड सुरूचवाळूज औद्योगिकनगरीत तोडफोडप्रकरणी पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी १७ व शनिवारी १९ हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीत नावे दाखल असलेल्या हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. रस्त्यावर गुंडगिरी करणाºया हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जात आहे, असे पोलीस उपायुक्त नीलेश खाटमोडे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.हल्लेखोरांची माहिती देण्याचे आवाहनया तोडफोड प्रकरणात सहभागी असलेल्या हल्लेखोरांची नावे पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे. या हल्लेखोरांची माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.अटकेतील आरोपींची नावेतोडफोड करणाºया १७ हल्लेखोरांना शुक्रवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून आदेश धोंगडे, रणजित चव्हाण, गजानन पाटील, दत्तात्रय घावट, योगेश झोरे, गोविंद जाधव, विठ्ठल मुळे, गणेश गायकवाड, राहुल पवार, कल्याण आग्रे, सूरज साळुंके, गोविंद देशमुख, ओम जाधव, रवी पठारे, रवी कानडे, सतीश शिंदे, सचिन सुकणे, शंकर चरखा, आदित्य लेंगरे या १९ हल्लेखोरांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व तक्रारीत नावे दाखल असलेल्या हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. गुंडगिरी करणाºया हल्लेखोरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त नीलेश खाटमोडे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.