शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

१८२६ शाळा पिछाडीवरच

By admin | Updated: January 26, 2017 00:06 IST

बीड : भौतिक सुविधांसोबतच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

बीड : भौतिक सुविधांसोबतच शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील अडीच हजारपैकी आणखी १८०० हून अधिक शाळा पिछाडीवरच आहेत. या शाळा जलद गतीने प्रगतीपथावर आणण्यासाठी आता अप्रगत शाळांमधील शिक्षकांना प्रगत शाळांमध्ये भेटी देणे अनिवार्य केले आहे. आगामी दोन महिन्यांत सर्वच शाळा प्रगतशील करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासन जोमाने कामाला लागले आहे.विद्यार्थ्यांना हसत- खेळत शिक्षण देणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन सुलभ करणे व विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होईल या दृष्टीने उपाय करणे असा प्रगत शाळांमागील हेतू आहे. शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे नाव आता जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे केले आहे. अप्रगत शाळा लवकरात लवकर प्रगत शाळांच्या रांगेत आणून ठेवण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुषंगाने २२ जानेवारी रोजी माजलगाव, गेवराई या तालुक्यांतील अप्रगत शाळांमधील शिक्षकांनी प्रगत शाळांना भेटी दिल्या आहेत. आता उर्वरित तालुक्यांमध्येही रविवारी अप्रगत शाळांचे शिक्षक प्रगत शाळांमध्ये जाऊन त्यांनी केलेल्या उपायांची माहिती जाणून घेणार आहेत. त्यानुसार आपल्या शाळेतही उपक्रम राबविले जणार आहेत. लोकसहभाग व उपलब्ध शासन निधीतून भौतिक सुविधांत वाढ केली जाणार आहे.दरम्यान, प्रगत झालेल्या शाळांना ‘शाळा सिद्धी’ या पोर्टलवर स्वयं-मूल्यमापन करावयाचे असून, त्यानंतर आॅनलाईन नोंद करावयाची आहे. (प्रतिनिधी)