सुनील कच्छवे, औरंगाबादराज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून मराठवाड्यात बांधलेल्या शेकडो कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विभागातील ५२५ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे तब्बल १८६९७ दरवाजे गायब झाले आहेत. त्यामुळे यंदा पुरेसा पाऊस झाला तरी विभागातील या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठणार नाही. परिणामी या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर शेतीला त्याचा फटका बसणार आहे. मराठवाड्याला मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकार जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन दरवर्षी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे याआधी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची अवस्था मात्र अतिशय वाईट झाली आहे. बहुतेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले असल्यामुळे हे बंधारे काही कामाचे उरतच नाहीत. मराठवाड्यात एकूण २६६३ कोल्हापुरी बंधाऱ्यांची उभारणी केलेली आहे. या सर्व बंधाऱ्यांना एकूण १ लाख ३८ हजार ९१२ दरवाजे बसविण्यात आलेले आहेत; परंतु गेल्या काही दिवसांत जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आतापर्यंत या बंधाऱ्यांचे तब्बल १८ हजार ६९७ दरवाजे गायब झाले आहेत. अडीच हजारपैकी ५२५ बंधाऱ्यांना सध्या एकही दार नाही. विशेषत: बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात ही संख्या मोठी आहे. बीड जिल्ह्यात तब्बल ५ हजार ६७ तर औरंगाबाद जिल्ह्यात ३३९१ दरवाजे चोरीला गेले आहेत. उर्वरित सहा जिल्ह्यांतही कमी अधिक प्रमाणात कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे गायब झाले आहेत. पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे सप्टेंबरअखेरीस कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये दरवाजे टाकून पाणी अडविणे आवश्यक असते. मात्र, जुलै महिना संपत आला तरी गेट खरेदी करण्याची कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही.४१३ कोटींची गुंतवणूक पाण्यातमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जिल्हा परिषद, स्थानिक स्तर, जलसंपदा आणि कडा कार्यालयाच्या माध्यमातून हे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. या सर्व बंधाऱ्यांवर तब्बल ४१३.३० कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र, आता या बंधाऱ्यांना दरवाजेच उरले नसल्यामुळे ही गुंतवणूक वाया जात आहे. सिंचन क्षमता घटणारमराठवाड्यातील सर्व कोल्हापुरी बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ३९ हजार ९५३ दशलक्ष घनफूट तर सिंचन क्षमता ८३ हजार २४५ हेक्टर आहे. मात्र, सद्य:स्थितीत सुमारे २० टक्के बंधारे दरवाजाविना आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठणार नाही. परिणामी १६ ते १७ हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळू शकणार नाही.गेटसाठी लागणार १३ कोटीविभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेने मराठवाड्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दरवाजांची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार चोरीला गेलेल्या दरवाजांच्या ठिकाणी नवीन दरवाजे टाकण्यासाठी १३.६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी मिळावा यासाठी शासनाकडे विभागीय स्तरावरून पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हाबंधारेगेट नसलेले दरवाजे गायब औरंगाबाद५५८१५१३३९१जालना२४६९३०२परभणी३७७४७५हिंगोली३०४१६५नांदेड१५७१३१८७बीड३७६२०८५०६७लातूर२८२३११५८३उस्मानाबाद९७७८९७५२७एकूण२६६३५१२१८६९७
१८ हजार दरवाजे गायब
By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST