शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरी जलाशयात १८ टक्के साठा

By admin | Updated: July 3, 2017 00:36 IST

नांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी जलाशयात रविवारी सकाळी प्रकल्पात १८ टक्के पाणी उपलब्ध झाले असून जलाशयाची पाणीपातळी कासवगतीने वाढत आहे़ गत दहा दिवसांपासून गोदावरी नदीक्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयात पाण्याचा येवा थांबला आहे़ नांदेडची तहान भागविणाऱ्या या प्रकल्पातील साठा समाधानकारक नसल्यामुळे पावसाळ्यातही शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यामुळे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले होते़ मे अखेर प्रकल्पात केवळ २ टक्के साठा उपलब्ध होता़ पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा आधार होता़ मात्र विष्णूपुरी जलाशय कोरडा पडल्याने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ यंदा पावसाने मृगात वेळेवर सुरूवात केल्यामुळे विष्णूपुरीतील पाणी झपाट्याने वाढू लागले़ पहिल्या दोन, तीन पावसाने जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला होता़ परंतु मागील दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने जलाशयातील पाणीपातळी वाढ थांबली आहे़ २२ जून रोजी जलाशयात १४़४७ दलघमी म्हणजे १७ टक्के साठा होता़ त्यानंतर ३० जून रोजी १४़७९ दलघमी म्हणजे १८़ ३१ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे़ मागील दहा दिवसांत विष्णूपुरी जलाशयातील पाणी पातळीची वाढ पावसाअभावी थांबली आहे़ दरम्यान, समाधानकारक पावसामुळे जूनमध्ये विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाल्याने महापालिकेने एक दिवसआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र अजुनही शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतातुर झाले आहेत़ जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ मृगाच्या पावसावर काही ठिकाणी पेरण्या केल्या होत्या़ या पिकांना आता पाण्याची गरज आहे़ अनेक ठिकाणी पिके वाळत आहेत़ आषाढात दमदार पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते, अशी शेतकऱ्यांत चर्चा आहे.