वडवळ ना़ : संपूर्ण गावात डेंग्यूसदृश्य रोगाचे थैमान चालू आहे़ अजुनही आठराजण तापाने फणफणत असून, दोघांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत़ कोरडा दिवस पाळून स्वच्छता मोहीम गतिमान करण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला सुनावले आहे़ डेंग्यू रोगाने एकाचा बळी घेतला असून तीन जण उपचार घेऊन परतले आहेत़ गावात अजूनही अठराजण तापाने फणफणत असून, उर्वरित सिरम घेतलेल्या रूग्णाचे रक्त नमुने लातूरच्या जिल्हा हिवताप कार्यालयात पाठवण्यात आले आहेत़ जिल्हा हिवताप अधिकारी बी़डी़ कडतेवार जानवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ वाय़एस़ दहिफळे , विस्तार अधिकारी ए़व्ही़ कुलकर्णी, आरोग्य सहाय्यक एस़डीक़ांबळे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बी़टी़ चव्हाण, जि़प़सदस्य अण्णासाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन कसबे, सरपंच भगवान लोखंडे, ग्रामविकास अधिकारी पी़व्ही़ रेड्डी, सदस्य विवेकानंद पाटील यांच्यासह अशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचाऱ्यांसह बैठक घेण्यात आली़ स्वच्छता मोहीम गतिमान करण्याची गरज असल्याचे सांगून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाअंतर्गत संपूर्ण गावात पाण्यात अॅबेट टाकण्याचे व डासांची उत्पत्ती ठिकाणे नष्ट करणे, धूर फवारणी करण्यात येत आहे़
तापाच्या आजाराने १८ जण त्रस्त
By admin | Updated: July 2, 2014 00:20 IST