शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

१७९ ग्रामपंचायतींची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: जिल्ह्यात १७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्या- त्या ग्रामपंचायतीची प्रभागरचना अंतिम करण्यात आली ...

ठळक मुद्देप्रभाग रचनेला अंतिम मान्यता ३ आॅगस्ट रोजीसर्वाधिक ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किनवट तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यात १७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून त्या- त्या ग्रामपंचायतीची प्रभागरचना अंतिम करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता ३ आॅगस्ट रोजी दिली जाणार आहे.सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर जिल्ह्यात होणाºया या पहिल्याच निवडणुका आहेत. सर्वाधिक ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किनवट तालुक्यात तर त्याखालोखाल २८ ग्रामपंचायती लोहा तालुक्यातील आहेत. माहूर तालुक्यात २६, हिमायतनगर २, हदगाव-६, अर्धापूर-२, नांदेड-८, मुदखेड-१, भोकर-३, उमरी-१, धर्माबाद-४, बिलोली-९, नायगाव- ७, कंधार-१५ आणि मुखेड तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. १५ जुलैपर्यंत प्रभाग रचनेवरील आक्षेप स्वीकारण्यात आले होते. या आक्षेपाची सुनावणी २५ जुलै रोजी घेण्यात येत आहे. या सुनावणीनंतर ३ आॅगस्ट रोजी प्रभागरचनेला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार ८ आॅगस्ट रोजी या ग्रामपंचायतीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदार यादीवर ८ ते १४ आॅगस्टदरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. या हरकती व सूचनांच्या अंलबजावणीनंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम केल्या जाणार आहेत. २१ आॅगस्ट रोजी प्रभागनिहाय मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाईल व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणत्याही ग्रामपंचायतीने एखाद्या अथवा एकापेक्षा जास्त जागेसाठी पोटनिवडणूक घेऊ नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम लावू नये, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.