बीड : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माता पदासाठी शनिवारी सहा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली़ २ हजार ४८२ पैकी १७७१ उमेदवार उपस्थित होते़ ७११ जणांनी दांडी मारली़औषध निर्माता पदाच्या २८१ जागांसाठी आॅनलाईन अर्ज मागविले होते़ सकाळी १० ते ११:३० या दरम्यान परीक्षा प्रक्रिया झाली़ गुरुकुल इंग्लिश स्कूल, मिल्लीया माध्यमिक मुलींची शाळा, शिवाजी विद्यालय, भगवान विद्यालय व चंपावती विद्यालय अशा सहा केंद्रांचा समावेश होता़ २०० गुणांची परीक्षा होती़ परीक्षेसाठी सहा केंद्रप्रमुख, सहा सहकेंद्रप्रमुख, ६ मदतनीस, २७ पर्यवेक्षक, १२५ समावेशक व ५५ राखीव अधिकारी- कर्मचारी तैनात होते़ उमेदवारांची तपासणी करुनच केंद्रात प्रवेश देण्यात आला़अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी विविध केंद्रांवर भेटी दिल्या़ (प्रतिनिधी)
१७७१ जणांनी दिली फार्मासिस्टची परीक्षा
By admin | Updated: November 10, 2014 01:18 IST