लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय व विनंती बदल्यांसाठी गुरूवारी सकाळी १० वाजल्यापासून समुपदेशन प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी विविध विभागांतील १५ प्रशासकीय व २ विनंती बदल्या झाल्या.लातूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वर्ग ३ व ४ च्या बदल्यांबाबत एक महिन्यापासून चर्चा आहे. त्या अंतर्गतच कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज ५ मे पर्यंत सादर केले होते़ पण या बदल्याचा मुहूर्त गुरुवारी निघाला. गुरूवारी सकाळी १० वाजल्यापासूनच पशुसंवर्धन, कृषी, अर्थ, लघुपाटबंधारे, महिला व बालकल्याण, सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. स्थायी समिती सभागृह, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात कर्मचाऱ्यांचे समुपदेशन झाले. समुपदेशानंतर आरक्षणानुसार प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. कृषी विभागाच्या प्रशासकीय एक व विनंती बदली एक अशा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली़ अर्थ विभागाच्या प्रशासकीय ८ व विनंती १ अशा ९ जणांच्या बदल्या करण्यात आल्या़ महिला व बालकल्याण विभागातील एका कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात आली़ लघु पाटबंधारे विभागाच्या प्रशासकीय ३, विनंती बदली १ व आपसी २ कर्मचाऱ्यांच्या बदल्या अशा एकूण ६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याही ़बदल्या करण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)
जि.प.च्या १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By admin | Updated: May 22, 2015 00:33 IST