शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१७ कोटींच्या कामांची लगीनघाई

By admin | Updated: February 15, 2015 00:49 IST

लातूर : मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची ओरड करणाऱ्या प्रशासनाने मार्च एण्डमुळे १७ कोटी रूपये मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत़

लातूर : मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची ओरड करणाऱ्या प्रशासनाने मार्च एण्डमुळे १७ कोटी रूपये मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत़ कोणत्या प्रभागात किती कामे करावयाची, याची चाचपणी सुरू असून नगरसेवकांकडून कामे मागविण्यात येत आहेत़ काँग्रेसचे बहुमत असलेल्या मनपात सत्ताधारी नगरसेवकांकडूनच पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्यात येत असताना तिजोरीत धूळखात पडलेल्या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी ‘कारभारी’कामाला लागले आहे़केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत लातूर महापालिकेला मिळालेल्या निधीची विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी विरोधकांसह काँग्रेसमधील काही नगरसेवकांना सोबत घेऊन आयुक्तांच्या विरोधात पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन केले होते़ निधी शिल्लक असतानाही तो खर्च करण्यात प्रशासनासह पदाधिकारीही अपयशी ठरल्याचा आरोप होत असताना तिजोरीत पडून असलेल्या १७ कोटींची विल्हेवाट लावण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे़ त्यानुसार प्रभागनिहाय कामांची यादी तयार केली जात असून नगरसेवकांना कामे सुचविण्यासाठी सांगण्यात आले आहे़पायाभूत विकास निधीतून ७ कोटी, दलित वस्ती सुधार योजना ३, नगरोत्थान २ कोटी ४०, दलितेत्तर १ कोटी ५० लाखांसह अन्य योजनेतील शिल्लक असलेल्या जवळपास १७ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत़ एकाच वेळी शहरात विविध ठिकाणी कामे सुरू असल्याने प्रशासनाकडून कामावर देखरेख केली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे़ कंत्राटदारांकडून आपल्या मर्जीप्रमाणे कामे उरकली जात असल्याचेही सांगितले जात आहे़ त्यातच आता नवीन १७ कोटीची कामे निघणार असल्याने नगरसेवक जास्तीत जास्त कामे मिळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत़ विधानसभा निवडणुकीपासून कामाची ओरड करणाऱ्या नगरसेवकांना प्रभागात विकास कामांसाठी निधी मिळणार असल्याने कामांची यादी तयार करण्याचे काम केले जात आहे़ शिवाय, सत्ताधारी विरोधकांत विकास कामांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)