शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोम्बिगमध्ये १७ आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:17 IST

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ सप्टेंबरच्या रात्री आयोजित कोम्बिग आॅपरेशनमध्ये पकड वॉरंटमधील तब्बल १७ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ सप्टेंबरच्या रात्री आयोजित कोम्बिग आॅपरेशनमध्ये पकड वॉरंटमधील तब्बल १७ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.नांदेडच्या इतवारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाणेहद्दीत २६ सप्टेंबरच्या रात्री कोम्बिग आॅपरेशन राबविण्यात आले.दरम्यान, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सपोनि. सुनील माने, पोउपनि. कल्याण नेहरकर, स्वाती कावळे, गजानन मोरे व पोउपनि. राजेश जाधव यांच्यासह ९० पोलीस कर्मचाºयांनी ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील असर्जन नाका, बळीरामपूर चौक येथे नाकाबंदी केली.त्याचवेळी कोम्बिग आॅपरेशन दरम्यान दोन ठिकाणी विशेष पथके स्थापन करुन व इंजेगाव, खुदबेनगर नांदेड, वसरणी, कौठा, बळीरामपूर व तुप्पा आदी भागांतील फरार तथा पकड वॉरंटमधील तब्बल १७ आरोपींना जेरबंद करण्यात आले. याशिवाय पोलिसांनी कोम्बिग आॅपरेशनदरम्यान दारुबंदीचाही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात देशी-विदेशी दारुच्या एकूण २४० बाटल्या जप्त केल्या. ज्याची किंमत १२ हजार ४८० रुपये असल्याची माहिती गोपनीय शाखेतील नापोकॉ. विलास गरुडकर यांनी दिली.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपअधीक्षक बनकर यांनी इतवारा हद्दीतही अशाप्रकारे कोम्बिग आॅपरेशन राबविले होते़