शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
4
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
5
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
6
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
7
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
8
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
9
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
10
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
11
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
12
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
13
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
14
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
15
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
16
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
17
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
18
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
19
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
20
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
Daily Top 2Weekly Top 5

१६० हजयात्रेकरूंना ५४ लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला राजस्थानमध्ये पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:13 IST

भोळ्या भाबड्या भाविकांना स्वस्तात हज आणि उमराची यात्रा करून आणण्याचे आमिष दाखवून १६० जणांकडून ५४ लाख रुपये गोळा करून पसार झालेल्या टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला जिन्सी पोलिसांनी राजस्थानमध्ये पकडले.

औरंगाबाद : भोळ्या भाबड्या भाविकांना स्वस्तात हज आणि उमराची यात्रा करून आणण्याचे आमिष दाखवून १६० जणांकडून ५४ लाख रुपये गोळा करून पसार झालेल्या टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला जिन्सी पोलिसांनी राजस्थानमध्ये पकडले.मीर अली इर्शाद महेमुद अली (४५,रा. प्रियदर्शनी कॉलनी, पडेगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मीर इर्शाद अली आणि त्याचा भाऊ जाहेद अली यांनी रोशनगेट आणि शहागंज भागात अशील टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय थाटले होते. तेथे त्याने स्वस्तात हज आणि उमराची यात्रा करून देतो, अशी जाहिरात केली होती. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार त्याने कमीत कमी ४० हजार ते ६० हजार रुपये असे वेगवेगळे दर ठेवले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून १६० जणांनी हज आणि उमराला जाण्यासाठी त्याच्याकडे बुकिंग केले आणि एकूण ५४ लाख रुपये त्याच्याकडे जमा केले. मोठी रक्कम हातात पडल्यानंतर आरोपींनी दोन्ही ठिकाणचे त्याचे कार्यालय बंद केले आणि ते मोबाईल बंद करून गायब झाले. कार्यालय उघडण्याची महिनाभर प्रतीक्षा केल्यानंतर सादीक अली सज्जद अहेमद रजवी (३९,रा. बायपास) यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात ९ जानेवारी रोजी फिर्याद नोंदविली. दोन्ही आरोपी भावांनी मोबाईल बंद करून नातेवाईकांसोबत संपर्क ठेवत नव्हते. मात्र, जिन्सी पोलीस त्यांचा शोध घेत होते. सायबर क्राईम सेलच्या तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपी मीर इर्शाद अली हा राजस्थानमध्ये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांना मिळाली.पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, कर्मचारी आर. एन. शेख, हारुण शेख, संपत राठोड, संजय गावंडे, धनंजय पाडळकर, सुनील जाधव आणि नागरे यांच्या पथकाने राजस्थानमधील कोटा गाठले. तेथे आरोपी मीर हा पप्पू बिल्डर नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून मीरला पकडले. त्याला घेऊन पोलीस औरंगाबादला आले.म्हणे दर वाढल्याने पळालोपोलिसांनी आरोपी मीरला फसवणुकीविषयी विचारणा केली तेव्हा त्याने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, हज आणि उमरा यात्रेचा खर्च वाढल्याने आम्ही बुकिंग करणाऱ्यांना प्रत्येकी पाच ते सहा हजार रुपये वाढून मागितले. तेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आपण पळालो.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी