शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गटाचे १६, गणांचे ३० अर्ज ‘आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:51 IST

उस्मानाबाद : वाशी आणि परंडा तालुक्यात सर्वच अर्ज वैध ठरले. उस्मानाबादेत गटातून एक तर गणातून पाच अर्ज अवैध ठरले.

उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १६५ जागांसाठी तब्बल १ हजार ८०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी या सर्व अर्जांची त्या-त्या तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. यावेळी वाशी आणि परंडा तालुक्यात सर्वच अर्ज वैध ठरले. उस्मानाबादेत गटातून एक तर गणातून पाच अर्ज अवैध ठरले. लोहाऱ्यात गणासाठीचा एक तर गटाचे पाच, तुळजापुरात गणाचे चार, कळंबमध्ये गणो चार आणि गटाचे तीन, उमरगयात गणाचे सात आणि गटाचे पाच तर भूम येथे गणाचे नऊ आणि गटांचे दोन उमेदवारी अर्ज विविध कारणांवरून अवैध ठरविण्यात आले. उस्मानाबाद येथे यात कुणाचे अर्ज सही नसल्याने तर कुणी अर्जासोबत सत्यप्रत जोडली नसल्याने अर्ज बाद ठरविण्यात आले. दरम्यान, अर्ज बाद ठरविलेल्या उमेदवारांना न्यायाधिशांकडे अपील करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत असून, ८ फेब्रुवारीपर्यंत यावर सुनावणी होवून निकाल दिला जाणार आहे. परंडा : तालुक्यात ५ गटासाठी ५९ तर १० गणासाठी एकूण ११९ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांनी सांगितले. शिवसेनेकडून जवळा (नि) गटातून दत्ता साळुंके, राष्ट्रवादीचे हणुमंत कातुरे, संजय पवार, भाजपाचे राहुल कारकर, काँगेसचे शिवाजी नाईकनवरे, रासपचे बप्पाजी काळे, लोणी गटात शिवसेनेकडून अर्चना जाधव, पार्वती जाधव, काशीबाई इतापे, भाजपच्या ज्योती टोंपे, संगीता चौधरी, शैला वेताळ, राष्ट्रवादीच्या सुनिता जाधव, काँगेसच्या अनिता काकडे, रासपच्या प्रज्ञा काळे,अनाळा गटात शिवसेनकडून गौतम लटके, पोपट गोडगे, भाजपकडून गिरीधर कोलते, राष्ट्रवादीचे दतात्रय पाटील, काँगेसचे नवनाथ तिंबोळे, मनसेचे नानासाहेब पडघन, कमलाकर खैरे, डोंजा गटात शिवसेनेकडून अंजली संदीप खरसडे, भाजपाकडून अर्चना गणेश खरसडे, राष्ट्रवादीकडून अविदाबाई जगताप, काँगेसकडून शशीकला गाढवे, शेळगाव गटात शिवसेनेकडून अंजली पाटील, भाजपाकडून सखूबाई पवार तर राष्ट्रवादीकडून अश्विनी भांडवलकर, काँगेसच्या शारदा भोसले आदींनी उमेदवारी दाखल केली. लोणी गणात शिवसेनेचे रणजित पाटील, शंकर इतापे, भाजपाकडून सुखदेव टोंपे, सोनारी गणात राष्ट्रवादीकडून सुधाकर कोकाटे, समाधान पाडूळे, शिवसेनेकडून डॉ. शहाजी मिस्कीन, बालाजी मिस्कीन, अंगद फरतडे, भाजपाकडून विलास खोसरे, मनोहर मिस्कीन, शिवानंद तळेकर, काँग्रेस बालाजी नेटके, आनाळा गणात राहूल डोके, भाजपा निशिकांत क्षीरसागर, राष्ट्रवादीकडून प्रणिता मोरे आदींनी अर्ज दाखल केले होते.