शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

१६ लाख रूपये ‘मातीत’; क्रीडा संकुलातील लॉनचा मांडला ‘खेळ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:40 IST

बीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन वर्षांपूर्वी मुख्य मैदानात १६ लाख रूपये खर्चून लॉन करण्यात आले होते. परंतु केवळ अधिकाºयांच्या हालगर्जीपणामुळे हे लॉन देखभालीअभावी खराब झाले आहे

ठळक मुद्देदेखभालीसाठी आलेला १३ लाख रूपयांचा निधी क्रीडा अधिकाºयांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकारक्रीडा कार्यालयातील ‘खेळा’ची बाहेर वेगळीच चर्चा सुरू

सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन वर्षांपूर्वी मुख्य मैदानात १६ लाख रूपये खर्चून लॉन करण्यात आले होते. परंतु केवळ अधिकाºयांच्या हालगर्जीपणामुळे हे लॉन देखभालीअभावी खराब झाले आहे. विशेष म्हणजे देखभालीसाठी आलेला १३ लाख रूपयांचा निधी क्रीडा अधिकाºयांनी हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वरिष्ठांकडून साधी विचारपूसही झाली नाही. त्यामुळे क्रीडा कार्यालयातील ‘खेळा’ची बाहेर वेगळीच चर्चा सुरू आहे.शहरात खेळांच्या मैदानासाठी अपेक्षेप्रमाणे कोठेच मोठे मैदान नाही. शहरात एकमेव जिल्हा क्रीडा संकुल आहे. त्यामुळे .येथे शहराच्या कानाकोपºयातून खेळाडू विविध खेळ खेळण्यासाठी येतात. तसेच तालुक्यापासून ते राष्ट्रीय स्पर्धा या संकुलात होतात. त्यामुळे येथे हजारो खेळाडूंची येथे येजा असते. परंतु येथे आल्यानंतर केवळ अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे खेळाडूंना कुठल्याच सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते.खेळांची आणि खेळाडूंची संख्या पाहून गत दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांच्या कार्यकाळात जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठी तब्बल ६० लाखांचा निधी आला होता. यासंदर्भात कामेही झाली होती. त्यानंतर त्यांची बदली झाली आणि परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकाºयांकडे बीडचा पदभार देण्यात आला. काही दिवस हे कार्यालय प्रभारींवरच राहिले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नंदा खुरपुडे रूजू झाल्या आणि कार्यालयाचे सर्व कामकाजच विस्कळीत झाले. आठवड्यातून दोन दिवस कार्याल्यात थांबायचे आणि बाकी दिवस विविध कारणांनी रजेवर रहायचे, असे नियमित सुरू राहिले. याचा फायदा घेत येथील जिल्हा क्रीडा अधिकारी एन.बसे यांनी खाजगी लोकांना हाताशी धरून कार्यालयाच्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केला.‘तो’ बसे यांचाच माणूस?कार्यालयातील कॅश बुक फाडणारा सचिन विभूते हा क्रीडा अधिकारी एन.बसे यांचाच माणूस होता. त्यांनीच त्याला ३०० रूपये प्रती दिन रोजगार देऊन ठेवल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. हा सर्व प्रकार बसे यांच्या सांगण्यावरूनच केल्याचीही माहिती आहे. योजनांतील घोटाळे तसेच लेखा परीक्षणात त्रुटी आढळू नयेत, यासाठी बसे यांनी हा प्रकार करण्यास विभूतेला भाग पाडले. त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केली आहे.