शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१५७ कारखान्यांकडे सव्वा कोटीचा कर थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:58 IST

घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटीचा कर थकल्यामुळे गावातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे थकीत कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामसभेत घेण्यात आला.

वाळूज महानगर : घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटीचा कर थकल्यामुळे गावातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे थकीत कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामसभेत घेण्यात आला.

घाणेगाव येथे झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिभा गायके तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य श्याम बनसोडे, पं.स.सदस्य सावळीराम थोरात, ग्रामविकास अधिकारी बी.बी.गव्हाणे, उपसरपंच रामकिसन म्हस्के उपस्थित होते. सभेत कारखान्यांकडे कर थकल्यामुळे विकास कामे रखडत असल्याची तक्रार पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया २३९ पैकी ८२ कारखान्यांनी कराचा भरणा केलेला आहे. मात्र, उर्वरित १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटींचा कर थकीत आहे. याच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून आठवडाभरापूर्वी कारखानदारांना नोटिसा बजावलेल्या आहेत. मात्र, याला प्रतिसाद मिळत नसल्याने जप्तीची कारवाई राबविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

तसेच विविध विषयांवर चर्चा करुन विकामकामांचे नियोजन करण्यात आले. विटावा व घाणेगावातील स्मशानभूमीची दूरुस्ती करणे, जमा खर्चास मंजुरी देणे, मंजूर असलेल्या ठरावाची अमंलबजावणी करणे आदींवर चर्चा झाली.

लाभार्थ्यांना धनादेश वाटपकार्यक्रमात स्वच्छतागृह उभारणाºया ७२ लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार या प्रमाणे ८ लाख ६४ हजार रुपयांचे धनादेश तसेच मनरेगाच्या ७ लाभार्थ्यांनाही धनादेश देण्यात आले. या प्रसंगी सदस्य केशव गायके, वंदना गायकवाड, कावेरी मुदीराज, दुर्गा दुबे, मिना काळवणे, सुमनबाई गव्हाणे, विजय शुक्ला, विद्या माळी, जगन्नाथ गायकडे, सुरेश गायकवाड, उत्तप्रसाद दुबे, संतोष गायकवाड, काकासाहेब बनकर, कैलास गायके, सोपान सातपुते,सुदाम बनकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसी