लातूर : आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या चालकांचा परवाना रद्द करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहनने हाती घेतली आहे़ त्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरणाची मुदत होती़ मात्र, दुष्काळामुळे नूतनीकरणाची मुदत वाढविली आहे़ आता ३० नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करता येईल.लातूर विभागात आॅटोरिक्षा परवान्याचे नूतनीकरण करून घेण्यासाठी आॅटोरिक्षा चालक संघटनांची बैठक घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नूतणीकरणासंदर्भात माहिती दिली़ वारंवार सूचना करूनही आॅटोचालकांकडून टाळाटाळ होत असल्याने प्रशासन नूतनीकरण न करणाऱ्या आॅटोरिक्षांचे परवाने रद्द करून नवीन लॉटरी पध्दतीने परवान्याचे वाटप करणार आहे़ मुदत वाढवून देण्यात यावी, यासाठी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आल्यावर ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ज्यांनी नूतनीकरण केले नाही, त्यांनी नूतनीकरण करून घ्यावे.३० तारखेनंतर परवाना रद्द होईल. शेवटची संधी म्हणून उशिरा योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणासाठी लागू केलेले सहमत शुल्क म्हणून मुंबई महानगरात २० हजार तर इतर क्षेत्रांमध्ये १५ हजार रूपये लागू करण्याचे आदेश आहेत़ त्यामुळे नुतणीकरणासाठी १५ हजारांहून अधिक खर्च येणार नाही़ जिल्ह्यातील १५४ परवान्याचे नुतणीकरण करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले.
लातूर विभागात १५३ परवान्यांचे नूतनीकरण
By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST