शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

१५० मीटरच्या जैन ध्वजाने औरंगाबादकरांचे लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:04 IST

परमेष्ठी ग्रुपच्या वतीने आयोजित गुरुगणेश तीर्थदर्शन पदयात्रा रविवारी सकाळी जालन्याकडे रवाना झाली. पदयात्रेत भाविकांनी १५० मीटर लांबीचा जैन ध्वज हाती घेतला होता. सर्वात लांब जैन ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कुंभारवाडा येथील महावीर भवन येथे सकाळी मिठाला

ठळक मुद्देधार्मिक : गुरुगणेश तीर्थदर्शन पदयात्रा जालन्याकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : परमेष्ठी ग्रुपच्या वतीने आयोजित गुरुगणेश तीर्थदर्शन पदयात्रा रविवारी सकाळी जालन्याकडे रवाना झाली. पदयात्रेत भाविकांनी १५० मीटर लांबीचा जैन ध्वज हाती घेतला होता. सर्वात लांब जैन ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.कुंभारवाडा येथील महावीर भवन येथे सकाळी मिठालाल कांकरिया, कन्हैयालाल रुणवाल, डॉ. प्रकाश झांबड, दिलीप मुगदिया आदी मान्यवरांनी यावेळी पदयात्रेस ध्वज दाखवला.कर्नाटक गजकेशरी गणेशलालजी म.सा. यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील १० वर्षांपासून औरंगाबाद ते जालना अशी पदयात्रा काढण्यात येते. यंदा या पदयात्रेत १५० मीटर ध्वज सर्वांचे आकर्षण ठरले. पदयात्रेत सहभागी शेकडो भाविक ध्वज हातात घेऊन पुढे जात होते.‘अहिंसा परमो धर्म की जय’, ‘ जिओ और जिने दो’ असा जयघोष करीत भाविक औरंगपुरा, क्रांतीचौक, जालना रोडमार्गे जालन्याकडे रवाना झाले. १६ जानेवारी रोजी गणेशलालजी म.सा. यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पदयात्रा जालन्यात पोहोचणार आहे. यंदा या पदयात्रेचे ११ वे वर्ष आहे. यावेळी जी.एम. बोथरा, विनोद बोकडिया, रवी लोढा, झुंबरलाल पगारिया, सुभाष देसरडा, राजेंद्र बोरा, सुभाष सुराणा, सुनील बंब, संतोष बोरा, प्रीतेश बोरा आदींची उपस्थिती होती.