शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

१५ हजार कोटींच्या कामांचे आज गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

By admin | Updated: December 25, 2015 00:06 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी १५ हजार ७०६ कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी १५ हजार ७०६ कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला असून, त्याचे भूमिपूजन उद्या २५ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होत आहे. चिकलठाणा येथील केम्ब्रिज शाळेजवळ सायंकाळी ४.३० वाजता हा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या समारंभाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतरही काही मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. देशभरात वाहतूक विकासासाठी ७ फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यातील ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स)च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहणार आहे. जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी- औरंगाबाद- धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी ते औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यामुळे भूमिपूजन रस्त्यांच्या यादीत औरंगाबाद शहरातील जालना रोडच्या कामाचा स्वतंत्र उल्लेख नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेला आ. अतुल सावे, पक्षाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, महिला मोर्चाच्या विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड, सभापती दिलीप थोरात आदींची उपस्थिती होती.