शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

१५ तहसीलदारांच्या बदल्या

By admin | Updated: July 23, 2016 01:17 IST

औरंगाबाद : तहसीलदारांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शुक्रवारी विभागातील पंधरा तहसीलदारांच्या बदल्या केल्या.

औरंगाबाद : तहसीलदारांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शुक्रवारी विभागातील पंधरा तहसीलदारांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद ग्रामीणचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांची औरंगाबादच्या अतिरिक्त तहसीलदारपदी (शहर) बदली करण्यात आली आहे. अर्धापूरचे (जि. नांदेड) तहसीलदार सतीश सोनी यांची औरंगाबादचे (ग्रामीण) तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे अतिरिक्त तहसीलदारपदाचा पदभार होता. संजय गांधी निराधार योजना विभागाच्या तहसीलदार सुमन मोरे यांची वैजापूरच्या तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक महेश सुधळकर यांची बदनापूरच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांची सुधळकर यांच्या जागी बदली करण्यात आली आहे. वडवणीचे (जि. बीड) तहसीलदार राजीव शिंदे यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख लिपिक म्हणून बदली करण्यात आली आहे. खुलताबादचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांची मानवत (जि. परभणी) येथे बदली करण्यात आली आहे. माजलगावचे तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांची खुलताबादचे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. उमरग्याचे तहसीलदार अरविंद बोलगे, लातूरच्या धान्य खरेदी अधिकारी राजश्री मोरे, परतूरचे तहसीलदार विनोद गुंडमवार, नांदेडचे महसूल सहायक सुरेश घोळवे, उमरीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तहसीलदारांच्या बदल्या करण्याचे अधिकार यापूर्वी महसूल मंत्र्यांना होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जून रोजी हे अधिकार विभागीय आयुक्तांना प्रदान केले. आठ तहसीलदारांच्या बदल्या करून विभागीय आयुक्तांनी पहिल्यांदाच हा अधिकार वापरला.