जालना : नगर पालिकेन कर वसुली मोहीम तीव्र केली आहे. विशेष वसुली अभियान सुरू असून, आत्तापर्यंत नगर पालिकेने पंधरा मालमत्ता जप्त करून त्यांना सील ठोकले आहे. गुरूवारी चंदनझिरा परिसरात पाच मालमत्तांना सील करण्यात आले. चार मालमत्ताधारकांनी कराची रक्कम भरल्याने त्यांची जप्ती टळली. चंदनझिरा परिसरातील भूषण राठोड, कलंदरखा गुलाबखा, अ. रहिम अ अमिनोद्दीन,लंकाबाई मदन, हिरालाल किल्लेदार यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सदर मालमत्ताधारकांना १९६५ अंतर्गत कलम १५२ नुसार नोटीस देऊन मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकार संतोष खांडेकर यांनी दिली. ही कारवाई कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे, शोहेब कुरेशी, रमेश शिंदे, चव्हाण, अजय पेम्बर्ती, नाईकवाडे, आगळे, प्रधान यांनी केली. थकबाकी तात्काळ भरण्याचे आवाहन नगर पालिकेने केले आहे.
नगर पालिकेने केल्या पंधरा मालमत्ता जप्त
By admin | Updated: March 3, 2017 01:26 IST