शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

१५ मिनिटांत संसार उघड्यावर!

By admin | Updated: October 19, 2014 00:20 IST

उस्मानाबाद : सायंकाळचा वेऴ़़ महिलांची घरातील कामकाजाची सुरू असलेली लगबग़़ शेतातील मजूर, शेतकऱ्यांना घराकडे येण्याची लागलेली ओढ़़

उस्मानाबाद : सायंकाळचा वेऴ़़ महिलांची घरातील कामकाजाची सुरू असलेली लगबग़़ शेतातील मजूर, शेतकऱ्यांना घराकडे येण्याची लागलेली ओढ़़ आणि त्यातच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात बरसलेल्या पावसात कोंडकरांचा संसार उघड्यावर आला़ केवळ १५ मिनिटेच हा प्रकार घडला असून, निसर्गाच्या कोपानंतर उन्मळलेली झाडे, घरांवरील उडालेली पत्रे, संसारोपयोगी वस्तूचे झालेले नुकसान पाहून प्रत्येकजण हतबल झाला होता़ निसर्गाच्या या प्रकोपाचा थरकाप उडविणारा प्रसंग कोंड (ता़उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांना शुक्रवारी सायंकाळी अनुभवास आला़उस्मानाबाद तालुक्यातील कोंडसह परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५़३० ते ५़४५ वाजण्याच्या दरम्यान अचानकच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़ अचानक ओढावलेल्या या प्रसंगामुळे घरात कामकाज करणाऱ्या महिला, चौकात थांबलेले ग्रामस्थ, शेतातून परतणारे आणि शेतात काम करणाऱ्या शेतकरी, मजुरांची मोठी तारांबळ उडाली़ पावसापेक्षा वादळी वाऱ्यामुळे केवळ १५ मिनिटांतच अनेकांचा संसार उघड्यावर आला़ क्षणार्धात वाऱ्याने केलेले नुकसान पाहता अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते़ यात घटनेत गोरोबा जमादा, दगडू लोंढे यांच्या घरावर झाड पडल्याने संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे़ तसेच लक्ष्मी गणपती करडे (वय-७५), गयाबाई दगडू लोंढे, रतनबाई सुरतसिंग तिवारी या तीन महिला घरावरील पत्रे उडाल्याने दगड पडून जखमी झाल्या आहेत़ तसेच बाजीराव कोळी, बालाजी जमादार, सुधाकर जमादार, सोमनाथ जमादार, हमीद मुलाणी, विश्वंभर जाधव, सय्यद शेख, पांडुरंग भोसले यांच्यासह जवळपास ३० जणांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत़ वाऱ्याचा जोर इतका होता की एक पत्रा विद्युत वाहिनीच्या पोलवर जावून अडकला होता़ या वादळी वाऱ्याचा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही फटका बसला असून, इमारतीवरील सोलार यंत्रणा आणि सिंटॅक्स टाक्या पडल्याने नुकसान झाले़ तसेच इतर ग्रामस्थांनाही या वादळी वाऱ्यामुळे नुकसान सहन करावे लागले आहे़ या घटनेनंतर शनिवारी सकाळी तलाठी श्रीनिवास पवार, ग्रामसेवक लिंबराज सुरवसे यांनी घरोघरी जावून पंचनामा केला़ यावेळी सरपंच इमामबी मुलाणी, ग्रापं सदस्या पद्मिणबाई भोसले, कमल भोसले, चेअरमन सुधाकर रोडगे, धर्मराज घाडगे आदीची उपस्थिती होती़