शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या दीड लाख खातेदारांची होईल कर्जमुक्ती

By admin | Updated: June 6, 2017 00:43 IST

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अल्पभूधारकांच्या कर्ज माफ घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८५ अल्प आणि अत्यल्प भूधारक खातेदारांना होईल

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अल्पभूधारकांच्या कर्ज माफ घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८५ अल्प आणि अत्यल्प भूधारक खातेदारांना होईल. त्यांच्यावरील कर्जाचा बोजा जवळपास ४३ हजार ६९२ कोटी रुपयांचा आहे.जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शासनास ३१ मार्च २०१७ रोजी पर्यंतची आकडेवारी पाठविली, त्यानुसार या कर्जमाफीचा फायदा वरील शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत होता. शेतकरी संपामुळे कर्जमाफीचा हा मुद्दा आणखी तीव्र झाला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात परळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारकांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली होती. बीड जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या आणि त्यांच्यावरील कर्जाचा आढावा घेतला असता वरीलप्रमाणे माहिती मिळाली. हे खातेदार फक्त डीसीसीच्या अखत्यारीतील आहेत. याशिवाय जिल्ह्यामध्ये विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. या कर्जाची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. या कर्जमाफीचा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कमी फायदा होत आहे. मराठवाडा आणि विदर्भात ५ एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या खातेदारांची संख्या ही पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जमीन ही कोरडवाहू अधिक असल्यामुळे बँकांमार्फत पाहिजे तेवढे कर्ज मिळत नाही.याउलट, पश्चिम महाराष्ट्रात अत्यल्प आणि अल्प भूधारकांची संख्या अधिक असून, ही जमीन बागायती आहे.मोठ्या प्रमाणावर फळे लागवड असल्यामुळे या खातेदारांना विविध बँकांनी कर्जही मोठ्या प्रमाणावर दिले आहे.