शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गाळे गहाण ठेवून घेतले १५ कोटींचे कर्ज

By admin | Updated: May 20, 2017 00:42 IST

लातूर : मनपाच्या मालकीचे गाळे असताना भाडेकरूने गहाण ठेवून बँकेकडून १५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मनपाच्या मालकीचे गाळे असताना भाडेकरूने गहाण ठेवून बँकेकडून १५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. याबाबतची माहिती, माहिती अधिकारात मागितल्यानंतर मनपाचे डोळे उघडले असून, संबंधित भाडेकरूस कागदपत्र तत्काळ महापालिकेत जमा करावीत, अशी नोटीस बजावली आहे. यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्सच्या पूर्व भागात बांधण्यात आलेल्या संकुलात १५ गाळे चंद्रकला व्यंकटराव पाटील यांना मनपाने भाड्याने दिली आहेत. तळमजल्यात गाळा क्र. १ ते ५, पहिल्या मजल्यात गाळा क्र. १ ते ५ आणि दुसऱ्या मजल्यावर १ ते ५ असे १५ गाळे मनपाने पाटील यांना दिले आहेत. संबंधित भाडेकरूने २३ फेब्रुवारी २०१५ रोजी बँकेकडून व्यवसायासाठी १५ कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी हे गाळे गहाण ठेवून सहमती द्यावी, असे पत्र महापालिकेला दिले. या पत्रानुसार महापालिकेने ३० मार्च २०१५ रोजी नाहरकत पत्र दिले. मात्र त्यावेळी ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यासंदर्भातील कागदपत्रे तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तावेज तयार केल्यास त्याच्या छायांकित प्रती महापालिकेत तीन दिवसांच्या आत द्याव्यात, असे सूचित केले होते. मात्र त्या संबंधित भाडेकरूने दिले नाहीत. माहिती अधिकारातील कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी मनपाकडे वरील गाळे कोणत्या बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले आहे का, अशी माहिती मागितली असता ही बाब उघडकीस आली आहे. वास्तविक पाहता मनपाच्या मालकीचे गाळे भाड्याने दिले, त्यावर भाडेकरूला कर्ज काढण्याचा अधिकार नाही. तसा नियमही नाही. परंतु, मनपाने डोळे झाकून नाहरकत प्रमाणपत्र दिले. मात्र आता मनपाने संबंधित भाडेकरू चंद्रकला व्यंकटराव पाटील यांना नोटीस पाठविली असून, गाळे व्यवसाय करण्यासाठी गहाण टाकले असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तावेजाची छायांकित प्रत तीन दिवसांच्या आत मनपा कार्यालयात जमा करण्यासाठी कळविण्यात आले होते. आपण याबाबत कोणताही खुलासा सादर केला नाही. तरी पुन्हा आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त कागदपत्रे महापालिकेस तात्काळ आठ दिवसांच्या आत सादर करावीत. सदर प्रकरणी कायदेशीर पेच निर्माण झाल्यास ती जबाबदारी व्यक्तिगतरीत्या आपल्यावर असेल, अशी नोटीस पाठविली आहे.