शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१५ थकबाकीदारांची मालमत्ता होणार जप्त

By admin | Updated: November 12, 2014 00:26 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार न्यायालयात जिल्ह्यातील १५ थकबाकीदार संस्थेच्या संचालक व सभासंदाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते.

शिरीष शिंदे , बीडजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार न्यायालयात जिल्ह्यातील १५ थकबाकीदार संस्थेच्या संचालक व सभासंदाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. सहकार न्यायालयाने त्यांच्या विरुद्धचे डिक्री सर्टिफिकेट दिले असल्याने आता सदरील १५ थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीचे अधिकार प्राप्त झाले आहेत. कर्ज भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. कर्ज न भरल्यास आता थेट जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीस मंडळाचे अध्यक्ष डी.बी. मुकणे यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध संस्थांनी कोट्यावधीचे कर्ज घेतले होते. एकूण ४४५ संस्थांनी १७८ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ३५४ संस्थांकडे १२३ कोटी ५९ लाख रूपये कर्ज आहे. यातील ४० संस्थांना बँकेच्या वतीने वारंवार नोटीसा पाठविण्यात आल्या मात्र त्यांनी कर्ज न भरल्याने औरंगाबादच्या सहकार न्यायालयात दावे दाखल केले होते. या ४० संस्थांकडे ७६ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे़ थकीत बाकी तात्काळ भरावी या आशाच्या या नोटिसा होत्या मात्र त्यांनी कर्जाचा भरणा केला नसल्याने त्यांची जंगम मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मयत कर्जदारांच्या कुटुंबीय, वारसदाराकडून वसूलीडीसीसी बँकेमार्फत ज्यांनी-ज्यांनी कर्ज घेतले आहेत त्यांना नोटीसा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जवळपास सर्वांना नोटिसा मिळाल्या आहेत. संस्थेचे संचालक मयत झाले असतील तर त्यांचे वारसदार,कुटुंबियाकडून कर्जाची वसूली होणार आहे. डीसीसीमार्फत अनेक संस्थांनी कर्ज घेतले आहे. जुन्या सर्व थकबाकीदारांची माहिती काढली जात आहे व नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने थकबाकीदारांना नियम १०७ अंतर्गत डिमांड नोटीस पाठविण्यात आली आहे़ सर्व थकबाकीदारांनी कर्ज भरावे, असे आवाहन प्रशासक मुकणे यांनी केले आहे़सहकार न्यायालयात खटले दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षाच्या वतीने चार्टड अकाँऊटंट मार्फत खाते उताऱ्यांची पडताळणी करण्याचे आदेशित केले जाते. ही पध्दत वेळखाऊ आहे़ दावे लवकरात लवकर निकाली काढले जावेत यासाठी दावा न्यायालयात दाखल होण्यापूर्वी बीड येथूनच चार्टर्ड अकाँऊटंट मार्फत खाते उताऱ्यांची पडताळणी करण्यात आली असल्याचे प्रशासक डी.बी. मुकणे यांनी सांगितले. त्यामुळे खटला दाखल झाल्यानंतर फारशा अडचणी भासणार नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.