शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांनंतर कामगारांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:04 IST

औरंगाबाद औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिल्याने कामगारांना १४ वर्षांनंतर न्याय मिळाला

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील इंडो-युरोपियन ब्रेव्हरेज कंपनी व्यवस्थापनाने युनियन लावण्याच्या कारणावरुन कंपनीतील कामगारांना कामावर येण्यास प्रतिबंध केला होता. मात्र, औरंगाबाद औद्योगिक न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिल्याने कामगारांना १४ वर्षांनंतर न्याय मिळाला असल्याची माहिती कामगारातर्फे अ‍ॅड. प्रदीप शहाणे यांनी रविवारी बजाजनगर येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी या निर्णयाविरोधात कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाही फेटाळण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अ‍ॅड. शहाणे म्हणाले की, इंडो-युरोपियन ब्रेव्हरेज कंपनी व्यवस्थापनाने कंपनीत कामगार युनियन लावण्याच्या कारणावरुन ८ मार्च २००५ मध्ये ६४ कामगारांना कामावर येण्यास प्रतिबंध केला. याविरोधात कामगारांनी ९ मार्च रोजी कंपनीसमोर आंदोलन केले. मात्र, सुरक्षा रक्षकांना गोळीबाराचे आदेश देवून हे आंदोलन मोडीत काढले. या गोळीबारात १० कामगार जखमी झाले होते. त्यांनतर यातील २२ कामगारांनी औरंगाबाद औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. यावर औद्योगिक न्यायालयाने ३१ मार्च २००८ रोजी कामगारांच्या बाजूने निर्णय देत संबंधित सर्व कामगारांना कामावर घेण्याचे व मार्च २००५ पासून वेतन देण्याचे कंपनी व्यवस्थापनास आदेश दिले. याविरोधात कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली. यावर न्यायमूर्ती व्ही.आर. किनगावकर यांनी ३ सप्टेंबर २०१० मध्ये निकाल देवून कंपनीची रिट याचिका फेटाळून लावली. या दोन्ही निर्णया विरुद्ध कंपनीने मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या डिव्हीजन बेंचपुढे अपिल दाखल केले. यावर २० मार्च २०१९ रोजी न्या. टी.व्ही. नलावडे व न्या. एस.के. कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली. सुनावणी अंती डिव्हिजन बेंचने कंपनीचे अपील फेटाळून लावले व औद्योगिक न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवल्याचे अ‍ॅड. शहाणे यांनी सांगितले.

तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे कंपनीने पालन न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचेही अ‍ॅड. शहाणे यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर धनवटे, पराग शाह, रामेश्वर शेगावकर, महेंद्र गरड, सोमनाथ जाधव, शिवाजी गायकवाड आदी कामगारांची उपस्थिती होती. या प्रकरणी इंडो-युरोपियन ब्रेव्हरेज कंपनीचे अमित पारीख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकलान नाही.

टॅग्स :WalujवाळूजWaluj MIDCवाळूज एमआयडीसी