शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

१३ पुरवठादारांनी रोखला ‘सर्वोपचार’चा औषधपुरवठा

By admin | Updated: January 31, 2017 00:12 IST

लातूर सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सध्या औषधांअभावी संकटात सापडले आहे़

हरी मोकाशे लातूरसर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सध्या औषधांअभावी संकटात सापडले आहे़ दीड महिन्यापूर्वी औषधी पुरवठ्याचा प्रस्ताव पाठवूनही औषध कंपन्या, कंत्राटदारांकडून पुरवठा करण्यात आला नाही़ जवळपास चार कोटींच्या थकबाकीमुळे हा पुरवठा रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दर्जेदार सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील तसेच सीमावर्ती भागातील रुग्ण येतात़ त्यामुळे दररोज १३०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचारासाठी नोंदणी असते़ सर्वोपचार रुग्णालयास वर्षाकाठी साडेपाच कोटी रुपयांपेक्षा जास्त औषधी लागतात़ या औषधी शासनाच्या दर करारानुसार औषधी कंपन्या तसेच कंत्राटदारांकडून खरेदी केल्या जातात़ दर तीन महिन्यांस सर्वोपचारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात उपलब्ध औषधींचा आढावा घेतला जातो़ गत डिसेंबरमध्ये हा आढावा घेण्यात येऊन जंतूनाशक, आयव्ही फ्ल्यूज, मेंदूविकार यासह शस्त्रक्रिया विभागातील औषधी आणि साहित्यांचा प्रस्ताव १३ कंत्राटदारांकडे पाठविण्यात आला़ ही औषधी व साहित्याचा डिसेंबरच्या अखेरीसपर्यंत पुरवठा होणे अपेक्षित होते़ परंतु, जानेवारी संपत आला तरी अद्यापही हा पुरवठा झाला नाही़ ही औषधी जवळपास ५५ ते ६० लाख रुपयांची असल्याचे सूत्रांनी सांगितले़सर्वोपचारला जवळपास दीडशे कंपन्या आणि कंत्राटदारांकडून औषध पुरवठा होतो. या पुरवठाधारकांचे सन २००५ पासून बिले थकीत आहेत़ त्यात औषध पुरवठा करणाऱ्या २० कंपन्या, कंत्राटदारांचे २२९ बिले थकीत असून त्याची १ कोटी १ लाख ६७ हजार ७४४ रुपये, तसेच याच कंपन्यांची दोन कोटींची १९७ बिले थकली आहेत़ सर्जिकल साहित्य पुरवठा करणाऱ्या २८ कंपन्यांची १ कोटी ९९ लाखांची ३१० बिले थकीत राहिली आहेत़