शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

औरंगाबादेत मालवाहतूकदारांच्या संपामुळे १२५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:41 IST

ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.

ठळक मुद्देउद्योगांचा कच्चामाल संपला : संप मालवाहतूकदारांचा; कंपन्यांचा ‘चक्का जाम’

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून वर्षभरात उत्पादनांतून सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी २० जुलैपासून संप पुकारला आहे. सलग सहाव्या दिवशी बुधवारी (दि.२५) मालवाहतूकदारांचा संप कायम होता. या संपाची सर्वाधिक झळ जिल्ह्यातील उद्योगांना सहन करावी लागत आहे. शहर आणि परिसरातील कंपन्यांना सहा दिवसांपासून कच्च्या मालाचा पुरवठा झालेला नाही. औद्योगिक वसाहतीत दररोज २ हजार ट्रकमधून जवळपास ३२ हजार टन कच्चामाल दाखल होत असतो. तामिळनाडू, गुजरात, चेन्नई आदी शहरांतून हा कच्चामाल शहरात दाखल होत असतो. सहा दिवसांत जवळपास १ लाख ९२ हजार टन माल दाखल झालेला नाही. त्यामुळे उत्पादनांवर परिणाम झाला आहे.बहुतांश कंपन्यांमध्ये किमान दोन दिवसांचा कच्चामाल असतो. त्यामुळे पहिले दोन दिवस कंपन्यांवर संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मालवाहतूकदारांचे ‘चक्का जाम’ आंदोलन लांबल्याने कंपन्यांवरील परिणामाची तीव्रता वाढली आहे. बहुतांशकंपन्यांना कच्च्या मालाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काम असून, उद्योग बंद ठेवण्याची नामुष्की कंपन्यांवर ओढावत आहे. मोठे, मध्यम आणि लघु उद्योग आणि उद्योजक आर्थिक नुकसानीला तोंड देत आहेत. कच्च्या मालाअभावी २४ तास चालणारी यंत्रे (असेंब्ली लाईन) थांबवावी लागत आहे. छोट्या-छोट्या वाहनांनी कच्चामाल मिळवून उद्योग सुरू ठेवण्याची धडपड केली जात आहे. परंतु हा प्रयत्न अपुरा पडत आहे. वाळूज येथील कंपन्यांतील उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. संप अधिक लांबला तर उद्योगांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.सहा दिवसांमध्ये कंपन्यांतील तयार झालेला मालही पडून आहे. त्यामुळे उत्पादनापोटी उद्योगांत येणारे कोट्यवधी रुपयेदेखील अडकू न पडले आहेत. एका उद्योगावर परिणाम झाल्याने त्यावर निगडित लघु उद्योगांची साखळी विस्कळीत झाली आहे.१५ टक्क्यांनी उत्पादन घटलेकच्च्या मालाअभावी कंपन्यांमध्ये १५ टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे. क च्च्या मालाअभावी उद्योगातील यंत्रे बंद पडत आहेत, अशी माहिती ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी दिली. मालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांमध्ये जवळपास १२५ कोटींचा भुर्दंड उद्योगांना सहन करावा लागला.उद्योग संघटनांची शासनाकडे मागणीमालवाहतूकदारांचा संप लांबल्याने उद्योग क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. संपामुळे उत्पादनांवर परिणाम होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे ‘सीएमआयए’ व ‘मसिआ’ संघटनेतर्फे सांगण्यात आले.संपाने जिल्ह्यातइंधन विक्रीत घटमालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुमारे ३ हजाट ट्रक बंद असल्याने डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपचालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील महामार्गांवर जवळपास २०० पंप आहेत. संपाने इंधन विक्रीवर परिणाम झाल्याचे औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी