शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

१,२४९ गावे टंचाईच्या फेऱ्यात

By admin | Updated: June 23, 2014 00:31 IST

औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत विभागातील १,२४९ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडली आहेत.

औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत विभागातील १,२४९ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडली आहेत. यातील ६५० गावांना टँकरने, तर उर्वरित गावांना विहीर अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या या आठवड्यात तब्बल ५२६ वर पोहोचली आहे. मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली होती. मात्र, आता ही टंचाई आणखी भीषण झाली आहे. त्यात पाऊस लांबल्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यात ८९३ गावांमध्ये टंचाई होती. या आठवड्यात ही संख्या १,२४९ झाली आहे. सध्या विभागात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५०० गावे आणि वाड्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी आहे. विभागातील ६५० गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३३ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १५४ गावांना या टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. बीड जिल्ह्यातही १७२ टँकर सुरू असून त्या ठिकाणी १४८ गावे आणि २११ वाड्यांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. परभणी जिल्ह्यात मात्र अद्याप टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही. अनेक ठिकाणी गावातच विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत विभागात ८४१ गावांमध्ये एकूण १,०५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी २६२ विहिरी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. उर्वरित विहिरी या त्या त्या गावातच असल्यामुळे नागरिकांना त्यावरूनच पाणी भरता येत आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३७४ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २८४, लातूर जिल्ह्यात १०६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. टँकरची संख्याजिल्हाटँकरऔरंगाबाद२३३जालना२८परभणी००हिंगोली०१नांदेड२०बीड१७२लातूर०७उस्मानाबाद६५एकूण५२६