शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील १२३ कर्मचाऱ्यांच्या वयाचा दाखला निघाला बोगस

By admin | Updated: June 11, 2014 00:53 IST

औरंगाबाद : महापालिकेत २००४ साली झालेल्या १,१२४ कर्मचाऱ्यांच्या भरतीत १२३ जणांचा वयाचा दाखला बोगस, तर १७४ जणांच्या दाखल्यातील नावात खाडाखोड असल्याची माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद : महापालिकेत २००४ साली झालेल्या १,१२४ कर्मचाऱ्यांच्या भरतीत १२३ जणांचा वयाचा दाखला बोगस, तर १७४ जणांच्या दाखल्यातील नावात खाडाखोड असल्याची माहिती पुढे आली आहे. वयाचा बोगस पुरावा देऊन मनपा सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी वेतनवाढ थांबविण्याऐवजी दंडात्मक कारवाई करून सेवादेश देण्याची शिफारस केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासनाने त्या कर्मचारी भरतीतील ५६० जणांना सेवापुस्तिका दिल्या आहेत. मंजूर पदांपेक्षा जास्तीची कर्मचारी भरती करण्यात आली. आरक्षणाचे नियम बदलण्यात आले. या सर्व बाबी तपासण्यासाठी आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी समिती गठीत केली आहे. ज्यांची कागदपत्रे योग्य असतील, त्यांनाच सेवापुस्तिका मिळेत, अशी त्यांची भूमिका आहे. ही आहे चौकशी समितीउपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी, एस.पी. काचावार, बी.बी. साळवे, मधुकर गंगावणे, गोविंद बारबोटे यांच्याकडे १२२ बनावट टीसी असलेले व २६२ सेवापुस्तिका दिलेल्या कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचे काम आहे. सहा. आयुक्त रोशन मकवाने, अभय प्रामाणिक, रझा अली, विलास भणगे यांची दुसरी समिती नावात फरक असलेल्या १७४ कर्मचाऱ्यांच्या मूळ आदेशानुसार सेवापट तयार करून परिविक्षाधीन कालावधी खुला करण्यासाठी कागदपत्रांची छाननी करील. आयुक्तांचा निर्णय असा १,१२४ नोकरभरतीतील ५६४ कर्मचाऱ्यांना सेवापट व परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जानेवारी २०१४ मध्ये घेतला. त्यासाठी त्यांनी विशेष समिती गठीत केली. ही समिती २००७ साली गठीत केलेल्या समितीच्या अहवालावरून ५६४ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी करील.शिपायांना पदोन्नती? पालिकेतील २५ शिपायांना लिपिक या पदावर पदोन्नती देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. वर्ग-३ च्या १७ व वर्ग-४ च्या १६ अनुकंपा धर्तीवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ही पदोन्नती थेट दिली आहे. अनुकंपा धर्तीवरील पदोन्नतीमुळे शिपायांच्या पदोन्नतीची चर्चा सुरू आहे.