औंढा नागनाथ : तालुक्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, सोमवारी राजदरी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतावर वीज पडली. ही वीज कापसाच्या पिकावर पडल्याने कापसाची एक हजार ते बाराशे झाडे करपली गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. औंढा नागनाथ तालुक्यात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्री पाऊस सुरू असताना मंगळवारच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही वीज कापसाच्या पिकावर कोसळली. यामध्ये गट क्र. २४७ मधील डिगाजी गंगाराम कऱ्हाळे यांच्या शेतातील १००० ते १२०० कापसाची झाडे होरपळली. मंगळवारी दुपारी मंडळ अधिकारी व्ही. के. पाखरे व तलाठी एन. व्ही. मुंढे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून, मागणी केली आहे. त्याच प्रमाणे सोनवाडी परिसरातही अशाचप्रकारे शेतावर वीज पडल्याची माहिती आहे; परंतु नेमके काय नुकसान झाले, याची माहिती मिळाली नाही. (वार्ताहर)
१२०० झाडे जळाली
By admin | Updated: September 2, 2014 23:59 IST