शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या १२०० लाभार्थ्यांवर होणार गुन्हे दाखल, प्रक्रिया सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:52 IST

औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला ...

ठळक मुद्देअनुदानाचा निधी लाटला पण काम करण्यास नकारघंटा वॉर्ड कार्यालयाकडून यादी प्राप्त होताच दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत

औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील असंख्य नागरिकांनी आपल्याकडे शौचालय नसल्याचे पुरावे सादर करून अनुदान घेतले. मात्र, प्रत्यक्षात शौचालय बांधत नसल्याचे समोर आले आहे. अनुदानाचा पहिला हप्ता घेतल्यानंतर शौचालये न बांधणा-या तब्बल १२०० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.

अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम वॉर्ड कार्यालयांवर सोपविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. शहरातील अनेक वसाहतींमधील नागरिक आजही उघड्यावर जातात. शहर हगणदारीमुक्त व्हावे यासाठी केंद्राने प्रत्येक नागरिकाला शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली. ९ हजार नागरिकांनी अनुदानाची मागणी केली. अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ६ हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. 

८ हजार लाभार्थ्यांपैकी ६ हजार लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांना वॉर्ड कार्यालय, स्वच्छता निरीक्षक यांच्यामार्फत सूचना देण्यात आली. १० महिने उलटले तरी शौचालयाचे बांधकाम केले जात नसल्याने अनुदान लाटणा-या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. १२०० लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम खर्च झाल्याचे मनपा अधिका-यांना सांगितले. ५० लाभार्थ्यांवर  पोलीस कारवाई केली आहे. वॉर्ड कार्यालयाकडून यादी प्राप्त होताच दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सार्वजनिक शौचालये कधी बांधणारशहरातील विविध भागात सार्वजनिक शौचालये बांधण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. सार्वजनिक शौचालयासाठी पाणी आणि ड्रेनेजलाइनची व्यवस्था केली जाणार असून मनपाच्या बांधकाम विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच तात्पुरती व्यवस्था म्हणून फिरते शौचालय देण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. भावसिंगपुरा, राजनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, रेल्वेस्टेशन यांसह इतर १० ठिकाणी शौचालये बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र शौचालय बांधण्याचे काम सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर शौचालये बांधणीसाठी जागाच निश्चित झालेली नाही.