जालना : शहरातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे व गौण खनिजचे अवैधरीत्या उत्खनन करून तिची वाहतूक करणारी १२ वाहने जालना तहसीलच्या पथकांनी शुक्रवारी पकडली आहे. या वाहनधारकांना २ लाख ७ हजार ६०० रूपयांचा दंड थोटावला आहे.तहसीलच्या पथकाने शहरातील भोकरदन नाका व अन्य भागात ही अवैध वाहतूक करताना मिळून आलेल्या वाहनांना पकडून त्यांना नियमानुसार दंड लावून हे वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आलेली आहे. पकडण्यात आलेल्या वाहन मालकांवर दंड ठोठावण्यात आला. त्यात उमेश वऱ्हाडे वाहन ( एम.एच २१ ए ६१७५), जीवन पाटोळ वाहन (एमएच २१ ए ६८१५) देवीदास जोगदंड (एम.एच १३ एक्स ३५५६) भरत कदम वाहन (२३०८), अशोक सांबरे (एमएक्सव्ही) ५१३६ या वाहनधारकांना प्रत्येकी १५ हजार ४०० रूपये दंड तर सोमनाथ जाधव वाहन ( एम.एच २१ डी ३३४२), गजानन पवार वाहन (एम.एच. २० व्ही ५८२१) शेष जाधव वाहन (एम.एच. २१ ५४१७) विलास रमेश कवडे वाहन यांना प्रत्येकी ५ हजार ४०० रूपये तर समाधान पाळोदे वाहन (एम.एच. २० बी.टी. ४२८९) कडून ६२ हजार ४०० तर किशोर जाधव वाहन ( एम.एच.२१ ५३३३) ३१ हजार २०० रूपये असा एकूण १२ वाहनधाकांना २ लाख ७ हजार ६०० रूपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती तहसीलच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
अवैध वाळू वाहतूक करणारी १२ वाहने पकडली; २ लाखांचा दंड
By admin | Updated: December 31, 2016 00:20 IST