शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाअभावी १२ कोटींचा निधी अन्यत्र वर्ग !

By admin | Updated: April 2, 2017 23:45 IST

लातूर : शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर करण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने जिल्ह्यातील सातपेक्षा जास्त विभागांतील १२ कोटींपेक्षा जास्त निधी अखर्चित राहिला आहे

लातूर : शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचा वापर करण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने जिल्ह्यातील सातपेक्षा जास्त विभागांतील १२ कोटींपेक्षा जास्त निधी अखर्चित राहिला आहे. मार्चअखेरीस हा निधी पुन्हा शासनाकडे परत जाऊ नये म्हणून तो मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेस समर्पित करण्यात आला आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तळागाळातील नागरिकांनाही लाभ व्हावा, यासाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून उपलब्ध केला जातो. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक योजनेसाठी आगामी वर्षात किती निधी अपेक्षित आहे, त्याचे नियोजन त्यापूर्वीच केले जाते. या नियोजनानुसार शासनाकडून कमी-जास्त प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. लातूर जिल्ह्यासाठी सन २०१५-१६ मध्ये १८३ कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध झाले होते. तर सन २०१६-१७ या वर्षासाठी २०० कोटी ४ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. सन २०१५-१६ च्या तुलनेत सन २०१६-१७ मध्ये शासनाकडून १७ कोटी ४ लाख रुपये अधिक उपलब्ध झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक विभागास पुरेसा निधी मिळून या विभागांतर्गतच्या योजना राबविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जिल्ह्यातील सात विभागांचे नियोजनच कोलमडल्याचे मार्चअखेरीस दिसून आले आहे. त्यामुळे या विभागातील उर्वरित निधी पुन्हा शासनाकडे परत जाण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान, हा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी समर्पित करण्यात आला आहे. निधी जिल्ह्यासाठीच राहिला असला, तरी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची मात्र तूट झाली आहे. वास्तविक पाहता खर्चाचे नियोजन वर्षभरापूर्वी होत असते. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे या निधीचा पुरेपूर उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध असतानाही त्याचा लाभ सामान्यांना मिळण्यास अडचण येते. (प्रतिनिधी)