शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

११७ गावांत तिव्र पाणीटंचाई

By admin | Updated: November 22, 2015 23:42 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होेत असून नागरीकांना अनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ १०७ ठिकाणी अधिगृहणे करूर ११७

लातूर : लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होेत असून नागरीकांना अनेक आडचणीला सामोरे जावे लागत आहे़ १०७ ठिकाणी अधिगृहणे करूर ११७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे तर ४५ गावांत ४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ तरीही पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याने अनेक पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, अहमदपुर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, उदगीर, देवणी आदी तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २१९ गावात ३३२ ठिकाणी अधिगृहणाची मागणी करण्यात आली आहे तर १६६ गावांतील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी २०५ टँकरची मागणी करण्यात आली आहे़ टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव मोठ्या संख्येने असतानाही पाणीटंचाईची तिव्रता लक्षात घेऊन अधिग्रहणाला व टँकरला जिल्हा परिषदेकडून मंजुरी दिली जात आहे़ लातूर जिल्ह्यातील १०५ गावातील टंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन ११७ ठिकाणी अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ ४५ गावातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे़ दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्याने अधिग्रहणे व टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना सुरु करावी, अशी मागणी जिल्हाभरातील नागरिकांतून केली जात आहे़ (प्रतिनिधी)टंचाई निवारणासाठी ८३० वाडी-तांड्यावर १३७० उपाययोजना राबविण्यात येणार असून, यासाठी बोअर अधिग्रहण, विहिर खोलीकरण यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ७ कोटी ३० लाखाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़ या आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणाचे काम गाव पातळीवर केले जाणार असल्याचे नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी सांगितले़ ४लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात ३़४५३, माकणी ७़३०५ दलघमी, तावरजा ०़६२५, रेणापूर ३़४१८, व्हटी ०़००२, तिरू ३़३२०, देवर्जन १़६३०, साकोळ ०़९९४ तर इतर प्रकल्पामध्ये ८़८९४ असा एकूण ५८़९२८ दलघमी पाणीसाठा आहे़ एकूण पाणीसाठ्यापैकी ७़२१ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच असल्याचे अभियंता करपे यांनी सांगितले़