शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील ११५ शस्त्रपरवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:38 IST

शस्त्र परवानाधारकांकडून मागविलेली माहिती उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील ११५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी एका आदेशानुसार रद्द केले आहेत. त्यामुळे शस्त्र परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शस्त्र परवानाधारकांकडून मागविलेली माहिती उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील ११५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी एका आदेशानुसार रद्द केले आहेत. त्यामुळे शस्त्र परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे़दोन दिवसांपूर्वी परभणी येथे निरज हॉटेलसमोर गोळीबार झाल्याची घटना घडली होती़ यात एक जण जखमी झाला होता़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकृत व अनाधिकृत शस्त्र परवानाधारकांची माहिती घेतली तेव्हा ही बाब स्पष्ट झाली़ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील ७६८ जणांना शस्त्र वापरण्याचा परवाना दिला आहे़ या परवानाधारकांचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात येते़ देश पातळीवर असलेल्या एका प्रणालीत शस्त्र परवानाधारकांची नोंद घेण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली़ डाटा बेस एनडीएएल या प्रणालीसाठी जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांकडून माहिती मागविण्यात आली होती़पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ आणि तहसील कार्यालयामार्फत परवानाधारकांना त्यांच्या परवान्यांसंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार परवाना निर्गमित केलेला दिनांक आणि जन्म दिनांकाबाबतची माहिती परवानाधारकांना द्यावयाची होती़ मात्र प्रशासनाला विहित वेळेत ही माहिती उपलब्ध झाली नाही़ त्यामुळे जिल्हा प्रशासन शस्त्र परवानाधारकांची माहिती एनडीएएल प्रणालीत भरू शकले नाही.एनडीएएल प्रणाली माहिती भरल्यानंतर प्रत्येक शस्त्र परवानाधारकांना त्यांचा युआयएन क्रमांक दिला जाणार होता़ मात्र माहितीअभावी परवानाधारकांना हा युआयएन क्रमांक उपलब्ध होवू शकला नाही़ परिणामी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी १ एप्रिल २०१७ पासून ११५ शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द केल्याचे आदेश काढले आहेत़