उस्मानाबाद : जिल्हा पोलीस दलातील तब्बल ३८ अधिकारी आणि २०९ कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास जिल्हाभर आॅल आऊट आॅपरेशन राबविले़ या कारवाईत विविध गुन्ह्यातील ११३ आरोपिंना जेरबंद करण्यात आले आहे़जिल्ह्यात वाढलेल्या चोऱ्या, गुन्ह्यांचे प्रमाण पाहता पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राज तिलक रोशन, शिलवंत ढवळे, चंद्रकांत खांडवी, प्रिती टिपरे यांच्यासह ३८ अधिकारी, २०९ कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्ह्याच्या १८ पोलीस ठाण्यांतर्गत विविध भागात ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबविले़ यात गुन्हेगारी वस्त्या तपासणे, फरार आरोपी, पाहिजे असलेले आरोपी, फेर अटक आरोपी, अजामिनपात्र वॉरंट मधील आरोपींचा शोध घेण्यात आला़ कारवाईदरम्यान ६ फरारी, ७९ अजामिनपात्र वारंटमधील व तपासावरील गुन्ह्यातील निष्पन्न २८ अशा एकूण ११३ जणांना अटक करण्यात आली़ तसेच पोलीस अभिलेखावरील ७६ हिस्ट्रीशीटर चेक करण्यात आले़ जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कारवाईमुळे मालमत्तेविषयी गुन्हा करणाऱ्या चोरट्यांचेही धाबे दणाणले आहेत़
११३ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: May 31, 2016 00:28 IST