शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

११०० रोहित्रांची दुरुस्ती; तरीही समस्या कायमच

By admin | Updated: January 31, 2017 00:21 IST

बीड बिघाडाचे प्रमाण अधिक असल्याने आजही रोहित्रांची समस्या जाणवत आहे.

राजेश खराडे बीडरबी हंगामात कृषिपंपांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरिता महावितरणने बीड विभागात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ११५० रोहित्रांची दुरुस्ती केली आहे. असे असूनदेखील बिघाडाचे प्रमाण अधिक असल्याने आजही रोहित्रांची समस्या जाणवत आहे. रोहित्रांच्या गैरवापराचा परिणाम महावितरणच्या यंत्रणेबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकावर झाला आहे.बीड विभागात ६ उपविभाग असून, केवळ बीड अर्बन वगळता इतर उपविभागांमध्ये रोहित्र बिघाडांची संख्या १०० वर गेली होती. रबी हंगाम सुरू होता पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मुबलक पाणी साठा असल्याने शेतकऱ्यांनी अधिकच्या कृषिपंपांचा वापर केल्याने रोहित्रांमधील बिघाड हे नित्याचेच झाले होते. १०० केव्ही रोहित्रावर ५० ते ६० कृषिपंप कार्यरत होऊ शकतात. मात्र, सरासरीपेक्षा दुपटीने त्याचा वापर होत होता. दिवसाकाठी ८ ते १० रोहित्रांमध्ये बिघाड होत असून, संबंधित एजन्सीकडून केवळ २-३ रोहित्रांची दुरुस्ती करून मिळत असे. दुरुस्ती व पुरवठ्यामधील तफावत हंगाम संपला तरी महावितरणला देखील भरून काढता आली नाही. शिवाय, शेतकऱ्यांनीही रोहित्रांचा आवश्यक तेवढाच वापर केला नाही.रोहित्रांची कमतरता असल्याने बीड विभागाने रत्नागिरी, पुणे, कराड, तुळजापूर, धुळे आदी विभागांकडून ६३ व १०० केव्हीएचे रोहित्र मागविले होते. शिवाय वरिष्ठ कार्यालयाकडून नियमितपणे १५५ रोहित्रांचा पुरवठा झाला होता. बीड ग्रामीण व गेवराई उपविभागात सर्वांत कमी वसुली असूनदेखील रोहित्र बिघाडाचे प्रमाण सर्वाधिक होते. रोहित्रांसाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या सुसंवादामुळे रबी हंगाम सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोहित्र वापराबाबत सातत्याने जनजागृती करीत इतर विभागांतून मदतही मागितली असल्याचे कार्यकारी अभियंता जी.बी. घोडके यांनी सांगितले.