शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

११० रुग्णालये परवानगीविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:34 IST

शहरातील तब्बल ११० जुने रुग्णालये परवानगीविना सुरू आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील काही वर्षांमध्ये औरंगाबाद शहरातील वैद्यकीय क्षेत्राने आपल्या नेत्रदीपक कामगिरीने गगनभरारी घेतली आहे. अवयवदानाच्या माध्यमाने वैद्यकीय क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी आपले नाव लिहिले. वैद्यकीय क्रांतीला छेद देण्याचा केविलवाणा प्रयत्न मागील काही वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेने सुरू केला आहे. शहरातील तब्बल ११० जुने रुग्णालये परवानगीविना सुरू आहेत. मनपाने नवीन नियमांचा फास लावून रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया थांबवून ठेवली आहे.औरंगाबादेतील वैद्यकीय क्षेत्राला मोठा इतिहास आहे. या क्षेत्रात मागील चार ते पाच दशकांपासून काम करणाºया डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्राला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन नवीन इतिहास रचला आहे. शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांनी एक दिवस संप पुकारल्यास परिस्थिती भयावह होते. घाटी रुग्णालयाकडे सर्वच रुग्णांना सेवा देण्याएवढी क्षमता नाही. जुन्या शहरात वर्षानुवर्षे सेवा देणाºया ११० रुग्णालयांना महापालिकेने नोंदणीची मुदत वाढवून दिलेली नाही. नवीन नियमानुसार रुग्णालयाच्या चारही बाजूने २० फूट जागा सोडावी, असा आग्रह मनपाचा आहे. जुन्या शहरात अत्यंत छोट्याशा जागेत अनेक डॉक्टर सेवा देत आहेत. आता नवीन नियमानुसार चारही बाजूने जागा सोडायची म्हटले, तर रुग्णालयासाठी जागाच शिल्लक राहत नाही. नवीन जागा खरेदी करून रुग्णालय बांधायचे म्हटले तर जागाही मिळत नाही. मिळाली तर ती अत्यंत महाग असते. एवढी किंमत आज तरी कोणीही मोजू शकत नाही.जुन्या शहरात ज्या डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले त्या इमारतीला रहिवासीचा बांधकाम परवानाआहे. त्या आधारावरच मनपाने परवानगी दिलेली आहे. आता जुन्या नियमांना समोर करून दवाखान्यांची परवानगी अडवून ठेवण्यात आली आहे.