शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार निराधारांचा ‘आधारवड’

By admin | Updated: August 20, 2016 00:54 IST

बीड : अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही दारिद्र्यरेषेच्या यादीत नाव नसलेल्या अभागी वंचितांना शासकीय योजनांपासून दूर ठेवले जाते. निवडणुका आल्या की त्यांच्या मतांचा वापर करून घेतला जातो.

बीड : अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही दारिद्र्यरेषेच्या यादीत नाव नसलेल्या अभागी वंचितांना शासकीय योजनांपासून दूर ठेवले जाते. निवडणुका आल्या की त्यांच्या मतांचा वापर करून घेतला जातो. मात्र, त्यांच्या समस्यांविषयी कोणीच आवाज उठवत नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.आठ वर्षांपूर्वी संजय गांधी निराधार समितीवर सदस्य म्हणून दिलीप भोसले यांची निवड झाली होती. समितीवर निवड झाल्यानंतर निराधार, वंचित घटकाच्या समस्या जवळून पाहिल्या अन् त्यांचे मन हेलावून गेले. मानधनासाठी बनविण्यात येणाऱ्या प्रस्तावाला चार ते पाच हजार रूपये घेतले जायचे ही वस्तुस्थिती होती. संजय गांधी निराधार समितीवर असतानाही भोसले यांनी या विरोधात आवाज उठवला व ‘शोले’ आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हाभरातून पाच हजारांवर निराधार उपस्थित होते. आंदोलनाचा परिणाम असा झाला की, साडेचार हजार निराधारांचे अनुदान शासनाने क्षुल्लक त्रुटीमुळे बंद केले होते, ते पुन्हा सुरू झाले. याबाबत सांगताना भोसले म्हणाले, बीड शहरात १९ हजार २०० कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. शासनाने त्यांना दारिद्रयरेषेचे प्रमाणपत्र दिलेले आहे. प्रमाणपत्र दिलेले असतानाही यातील ७० हजारांवर निराधारांकडे राशनकार्ड नाही. त्यांना धान्य मिळत नाही ही वस्तुस्थिती आजघडीला निर्माण झालेली आहे. यापुढे शासनाने दारिद्रय रेषेचे राशनकार्ड देऊन या गोरगरीबांना धान्य पुरवठा करावा, हीच आमची यापुढील काळातील मागणी असल्याचे सांगत, ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत निराधार संघर्ष समितीच्या माध्यमातून मी ११ हजार लोकांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. सध्याचे सरकार हुकूमी राजवटीप्रमाणे कारभार करीत आहे. शासन धोरणाचा गोरगरीब नागरिकांवर विपरित परिणाम होत आहे. शासनाने निराधारांच्या मानधनात केलेली वाढ फसवी आहे. यापुढील काळात सरसगट निराधार लाभार्थ्यांना प्रत्येकी हजार रूपये मानधन द्यावे. आतापर्यंत समाजकार्यातून लढा दिला, यापुढे नगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)