बीड : जिल्ह्यात साथरोगांनी आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस साथरोगांच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी येथील एका खाजगी दवाखान्यात डेंग्यू सदृश्य ११ रूग्ण आढळून आले. सिद्धी प्रवीण वीर, योगीता शिवाजी जाधव, अदनान अय्याज तांबोळी, सूरज सुनील थोरात, अफिया शेख, विनायक बालासाहेब जाधव (सर्व रा. नांदुर ता. केज), अक्षरा बालासाहेब आवाड (शिरूर ता. केज), आदेश बालासाहेब आवाड (शिरूर), कार्तिक सखाराम कुंभार (रा. काळेगाव ता. बीड), सिद्धेश्वर भागवत भगत, वैष्णीव वचिष्ट आबुज (दोेघे रा. चिंचोली ता. गेवराई) यांचा समावेश आहे. दोन ते चौदा वयोगटातील ही बालके आहेत. त्या सर्वांवर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले. पावसाळ्यात साथरोग पसरण्याची दाट शक्यता असते. या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. शिवाय बालकांना वेळेवर लस टोचून काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. जानवळे यांनी दिला. (प्रतिनिधी)
बीडमध्ये आढळले ११ डेंग्यू सदृश्य रूग्ण
By admin | Updated: August 10, 2014 02:22 IST