शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

११ शेतकऱ्यांनाच शेततळ्यांचा लाभ

By admin | Updated: May 23, 2016 23:34 IST

विलास भोसले ल्ल पाटोदा मागेल त्याला शेततळे योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे.

विलास भोसले ल्ल पाटोदामागेल त्याला शेततळे योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे. केवळ ११ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून ८ तलावांची कामे सुरू आहेत. तालुक्यातील खडकाळ जमिनीत तलाव खोदण्यास किमान दीड लाख रूपये खर्च येतो. शिवाय ताडपत्री टाकली तरच शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडेच पाठ फिरवली असल्याचे पहावयास मिळते. गतवर्षी दुष्काळ पाहणी निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुका दौऱ्यावर आले होते. सौताडा येथील कार्यक्र मात ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचे घोषित केले होते. मात्र, त्यासाठीच्या अनुदानाचा उल्लेख केला नव्हता. काही दिवसानंतर ५९ हजार रूपये अनुदान जाहीर केले.पाटोदा तालुका बालाघाट आणि पायथ्याशी अशा दोन भूप्रदेशात मोडतो. तालुक्यात ‘बेसाल्ट’ प्रकारचा कडक खडक आहे. काही भाग वगळता सर्वत्र ३ ते ५ फुटांवर खडक लागतो. शेततळ्याची खोली किमान ३ मीटर म्हणजे सुमारे १० फूट घेणे बंधनकारक आहे. अशा अवस्थेत ५० हजार रूपयात तळ्याची निर्मिती होऊच शकत नाही असे चित्र आहे. शिवाय शेततळ्यात पाणी साठून राहण्यासाठी ताडपत्री असणे आवश्यक आहे. ताडपत्री नसल्यास पाणी टिकत नाही. मार्चमध्ये मंत्री दिलीप कांबळे तालुका दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांनी ताडपत्रीची गरज आणि अनुदान वाढीची मागणी नोंदवली होती. कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यामूळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले प्रत्यक्षात निर्णय झाला नाही त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.