शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

प्रत्येक वॉर्डात ११ सफाई कामगार

By admin | Updated: January 11, 2016 00:07 IST

औरंगाबाद : सर्वच वॉर्डात सफाईचे काम योग्य पद्धतीने व्हावे यासाठी महापालिकेने सफाई कामगारांच्या पुनर्नियुक्त्या केल्या आहेत.

औरंगाबाद : सर्वच वॉर्डात सफाईचे काम योग्य पद्धतीने व्हावे यासाठी महापालिकेने सफाई कामगारांच्या पुनर्नियुक्त्या केल्या आहेत. एकेकावॉर्डात किमान ११ सफाई कामगार देण्यात आले आहेत. आतापर्यंत मोजक्याच वॉर्डांमध्ये जास्त संख्येने सफाई कामगार कार्यरत होते. तर उर्वरित वॉर्डांना अगदी दोन, तीन किंवा चारच कामगार देण्यात आलेले होते. मनपा प्रशासनाने शहर कचरामुक्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी घरोघर जाऊन ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा केला जात आहे. त्याला अनेक वॉर्डात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बहुसंख्य ठिकाणच्या रस्त्यालगतच्या कचराकुंड्या गायब झाल्या आहेत. मात्र, काही वॉर्डात सफाई कामगारांची संख्या कमी असल्यामुळे त्यात अडथळा येत होता. सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी हा मुद्दा लावून धरला. वजनदार नगरसेवकांच्या आग्रहास्तव काही वॉर्डात अगदी ३०-३०, ३५-३५ सफाई कामगार टाकण्यात आले होते. तर उर्वरित वॉर्डांमध्ये सफाई कामगारांची संख्य कुठे दोन, कुठे पाच आणि कुठे दहा, अशी होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व सफाई कामगारांचे समान वाटप करण्याच्या सूचना घनकचरा विभागाला दिल्या. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी सफाई कामगारांच्या पुनर्नियुक्त्या केल्या आहेत. आता प्रत्येक वॉर्डात किमान ११ सफाई कामगार देण्यात आले आहेत. ज्या वॉर्डात बाजारपेठा आहेत, भाजीमंडई आहे, अशा ठिकाणी ही संख्या मात्र गरजेप्रमाणे वाढवून देण्यात आली आहे. मनपाचे प्रयत्न, नगरसेवकांचा पुढाकार आणि स्थानिक नागरिकांची साथ, यामुळे शहरातील १२ वॉर्ड कचरामुक्त झाले आहेत. येथे घरोघर जाऊन नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. ४त्यातील ओला कचरा वॉर्डातच मोठ्या खड्ड््यात टाकून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. तर सुक्या कचऱ्यातील बहुतांश भाग कचरा वेचक व्यक्ती घेऊन जातात. शिल्लक राहिलेला २० ते २५ टक्के कचरा नारेगावकडे पाठविला जातो. ४सध्या गणेशनगर, गुलमोहर कॉलनी, नेहरूनगर, राजाबाजार, नागेश्वरवाडी, सिडको एन-३, विष्णूनगर, विठ्ठलनगर, वेदांतनगर, नंदनवन कॉलनी, देवानगरी आदी वॉर्डात हा प्रयोग सुरू असल्याचे घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख शिवाजी झनझन यांनी सांगितले.