शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्याचे १०७ बळी

By admin | Updated: July 17, 2017 00:46 IST

जालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खड्डेमय रस्ते, अवैध वाहतूक, भरधाव वाहन चालविण्याच्या सवयीमुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर सहा महिन्यांत २०६ अपघात झाले आहेत. यात १०७ जणांनी जीव गमावला असून, १३६ जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील वाढते अपघातांचे प्रमाण ही गंभीर समस्या ठरत आहे.जिल्ह्यातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन, भरधाव वाहन चालविणे या प्रकारांमुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय, राज्य व अन्य रस्त्यांवर एक जानेवारी ते १० जुलै २०१७ दरम्यान अपघाताच्या २०६ घटना घडल्या आहेत. वडीगोद्री, अंकुशनगर या भागातून जाणाऱ्या सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या सात घटनांमध्ये तीनजण ठार झाले असून, आठ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. जालना-औरंगाबाद, जालना-भोकरदन, जालना-परभणी, जालना-बीड, जालना-बुलडाणा, सिंदखेडराजा या राज्यमार्गावर १०७ घटना घडल्या आहेत. यात ६० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ८३ गंभीर तर १४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर ९२ अपघातांमध्ये ४४ जणांचा बळी गेला आहे. तर ६५ जण जखमी झाले आहेत. अपघाती मृतांमध्ये पुरुषांची संख्या १०१ असून, घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. अवैध वाळू वाहतुकीमुळे भोकरदन, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी आहे. अपघात वाढीचे हे एक प्रमुख कारण असून, याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.